हल्लेखोर वाळू तस्करांना मोका लावा

माण तालुका महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

गोंदवले, दि. 30 (प्रतिनिधी) – कराड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि लिपिक यांना वाळू तस्करांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ माण तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. वाळू तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही तोवर काम सुरू करणार नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कराड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मकरंद साळुंखे आणि लिपिक संतोष गुल्हाने यांना अवैध वाळू आणि गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक आढळला. त्यांनी कर्तव्य बजावण्यासाठी तपासकामी ते वाहन कराड तहसीलदार कार्यालयात घेऊन जात असताना तासवडे टोल नाक्‍यावर वाहगाव हद्दीत सहा ते सात वाळू व्यायावसायिकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच अमानुष मारहाण करण्यात आली. यामध्ये साळुंखे यांना गंभीर दुखापत झालेली आहे. यापूर्वी वर्धनगड घाटात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर (एमएच 11 बीडी 76) दिसताच त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याना एका फॉर्च्युनरमधून आलेल्या वाळू व्यावसायिकांनी गाडी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. घटनेच्या निषेधार्थ माण तालुक्‍यातील वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद करत हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माण तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत दीक्षित व सर्व महसूल कर्मचारी कोतवाल यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)