हल्लेखोरांवर कारवाईची आदिवासी संघटनेची मागणी

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेवरील हल्ला प्रकरण
अकोले – पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसखोरी करुन कार्यालयातील साहित्याची मोडतोड केली.या घटनेचा निषेध करून कायदा हातात घेणाऱ्या व राज्यघटेनचा अवमान करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या समाजकटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमाती हक्‍क संरक्षणार्थ संघटनेच्या अकोले व संगमनेर शाखेने केली आहे. यासंदर्भात तहसीलदार मुकेश कांबळे यांना आदिवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ विष्णू बुळे व कार्यकर्त्यांनी गुरुवारी निवेदन दिले.
दि. 24 ऑगस्ट 2018 रोजी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसखोरी करुन काही गुंड प्रवृत्तीच्या व विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी या कार्यालयात पत्रके फेकुन कार्यालयातील साहित्याची मोडतोड केली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी व संशोधनासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने अनेक संदर्भ पुस्तके, सर्व्हेक्षण व संशोधनसंबंधी कागदपत्रे, जुने व प्राचीन दस्तावेज, प्राचिन मौल्यवान छायाचित्रे उपलब्ध करुन दिलेली आहेत. या संस्थेस शासनाने स्वायत्त संस्थेचा दर्जा दिलेला आहे. ही संस्था गेल्या 50 वर्षांपासून आदिवासी संदर्भात काम करीत असून ही देशातील नामवंत संस्था म्हणून गौरविण्यात आलेली आहे.असे निवेदनात म्हटले आहे.
या संस्थेवर हल्ला म्हणजे आदिवासी जनतेच्या काळजावर हल्ला करण्यासारखे असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्‍त करीत आहोत. या घटनेची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे तहसीलदार कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.विष्णु बुळे, उपाध्यक्ष डॉ.वाळू भांगरे, कार्याध्यक्ष भागवत लेंडे, सचिव ज्ञानेश बागूल, कोषाध्यक्ष शिवराम कोंडार, बी.जी.भांगरे, सी.आय.गोडे, नगरसेवक नामदेव पिचड, अशोक इरणक, एल. डी. धराडे, डी. बी. कोकतरे, के. एन. भोजने, आर. के. मेंगाळ, एन. एम. भालचिम, पी.एम.गोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)