हरीभाऊ बोला काय म्हणताय? ; मोदींचा लाभार्थ्याशी मराठीतून संवाद

नवी दिल्ली : मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील नाशिकच्या व्यक्तीशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे मुद्रा योजनेचे लाभार्थी असणारे हरी गनोर ठाकूर यांच्यासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुद्रा योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी बातचीत केली. विशेष म्हणजे मोदींनी सहज आणि सोप्या शैलीत हरी ठाकूर यांच्याशी संवाद साधला. मात्र या लाभार्थ्याला मराठी येत नसल्याने, पुढील संवाद हिंदीतच झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशभरात लहान-मोठ्या व्यवसायांना लाखो, कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं. पंतप्रधानांनी मंगळवारी सहकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅप आणि व्हिडीओ कॉन्‍फ्रन्सिंगद्वारे मुद्रा योजनेच्या लाभार्थ‍ींशी संवाद साधला.

या योजनेमुळे माझं आयुष्य बदलल्याचं हरी गनोर ठाकूर यांनी सांगितले. तर दुसरीकडे मुद्रा योजनेअंतर्गत सर्वाधिक कर्ज महिला, तसंच गरीब दलित नागरिकांना मिळाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)