हरवलेला मुलगा पोलिसांमुळे सुखरुपपणे आईच्या ताब्यात

हरवलेला मुलगा पोलिसांमुळे सुखरुपपणे आईच्या ताब्यात
पुणे,दि.19-आई कामावर जात असताना गपचूप तीच्यामागे निघालेला चिमुकला लष्कर परिसरातील खड्डा मार्केटमध्ये हरवला होता. एक फळविक्रेत्याने पुलगेट चौकीतील पोलिसांना याची खबर दिली. यानंतर पोलिसांनी शोध घेत त्याला आईच्या ताब्यात सुखरुप सोपवले.

आज (शनिवार) सकाळी खड्डा मार्केटमधील फळविक्रेता गुलाम शेख ( 35 ) याने पुलगेट चौकी येथे येऊन सांगितले की, त्यांच्या फळाच्या गाडी पाशी एक मुलगा साधारण 6 वर्षे वयाचा मुलगा येऊन रडत आहे. तो हरवला असावा अशी शक्‍यता आहे. तेव्हा पुलगेट मार्शल पोलीस नाईक फल्ले, पोलीस शिपाई दराडे असे सदर ठिकाणी गेले. त्यांनी मुलास चौकिस आणून त्याचे नाव विचारले. तो त्याचे नाव ओंकार असे सांगत होता, मात्र कुठं राहत आहे विचारले असता त्याला पत्ता सांगता येत नव्हता. यामुळे पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगेट चौकी अंमलदार सहा.पो.उपनिरीक्षक पिलानि ,पोलीस नाईक फल्ले, पोलिस शिपाई दराडे असे सदर मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी खड्डा मार्केट व परिसरात फिरत होते. या ठिकाणी शोध घेते वेळेस एक महिला निर्मला मारुती धोत्रे (रा. भोपळे चौक,लष्कर) भेटली. या महिलेने सांगितले माझा मुलगा मी कामाला जात असतांनी माझ्या मागे आला पण मला मिळून येत नाही सांगितले. तेव्हा त्या महिलेस पुलगेट चौकी येथे आणले व सदर मुलास दाखवले सदर मुलगा हा त्या महिलेचा आहे असे तिने सांगितले. सर्व खातरजमा करून सदर मुलास त्याच्या आईच्या ताब्यात दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.