हरगुडे येथील महादेव मंदिराचा कलशारोहण उत्साहात

परींचे- हरहर महादेवचा गजर, फटाक्‍यांची अतीषबाजी, ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्रावण सरी अंगावर झेलत अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात पुरंदर तालुक्‍यातील मौजे हरगुडे येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 40 लाखांहून अधिक रक्कम लोकवर्गणीतुन जमा करून महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. श्रावण पौर्णिमेच्यानिमित्ताने कलशारोहण, श्री दत्त व श्री गणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. गणेशपूजन, नवग्रह स्थापना, प्रधानदेवता पूजन, हवनविधी आदी विधी संपन्न झाल्यावर डीजे, बॅंड, ढोल ताश्‍यांच्या गजरात वीर, यादववाडी, परिंचे, राऊतवाडी, कांबळवाडी व सटलवाडी आदी गावांतून मूर्ती व कलशाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ह. भ. प. चंद्रकांत वांजळे यांचे कीर्तन झाले. सोमवारी दुपारी दोन वाजता बालयोगी ह. भ. प. हनुमंत महाराज जगताप यांच्या हस्ते मुख्य कलशारोहण पार पडले. दिपक गोडबोले, गणेश सरनाईक, यशवंत हरगुडकर यांनी धार्मिक विधी केले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ह. भ. प. राहुल येडशीकार यांचे कीर्तन झाले. यावेळी सर्व माहेरवासिनींना गावकऱ्यांकडून साडी-चोळी भेट देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)