हद्दीजवळील गावांचे पाणी तोडले

शहरालाचा पाणी कमी पडत असल्याने निर्णय


नागरिकांची भिस्त आता पूर्णपणे टॅंकरवरच


पाच गावांकडे मोठी थकबाकी असल्याने अडचण

पुणे – महापालिका हद्दीजवळील 5 किलो मीटरपर्यंतच्या गावांना महापालिकेने पाणी देण्याविषयी राज्यशासनाचे आदेश असले, तरी शहरालाच उपलब्ध असलेले पाणी कमी पडत असल्याने महापालिकेने हद्दी पासून पुढे पाणी देणे बंद केले आहे.

सध्या महापालिकेकडून केवळ खडकवासला धरण ते महापालिका हद्दीत (धायरी) पर्यंत पालिकेच्या बंद जलवाहिनीच्या आसपास असलेल्या चार ते पाच गावातच पाणी दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाच्या या आदेशानुसार महापालिकेकडून हद्दीजवळील सुमारे 15 ते 20 गावांना पाणी दिले जात होते. मात्र, 2017 मध्ये राज्यशासनाने या गावातील 11 गावे महापालिकेत घेतली आहेत. तर उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेची हद्द सुमारे 333 चौरस किमी. झाली असून, उर्वरित गावे आल्यास ही हद्द 552 चौरस किमी होणार आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा या हद्दीबाहेर जाऊन पाणी देणे शक्‍य नाही. तसेच तशी कोणतेही वितरण व्यवस्था महापालिकेकडून उभारली जाणार नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने 11 गावे हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर 5 किमीपर्यंत इतर गावांना दिले जाणारे सर्व पाणी बंद केले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना दिली. तसेच या गावाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची थकबाकी होती. मात्र, काही गावे पालिकेत आल्याने तसेच उर्वरित गावे भविष्यात येणार असल्याने त्यांच्याकडून आता हे पैसेही मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपनगरांना फटका
महापालिकेने या गावाचे पाणी बंद केल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका शहरातील उपनगरांत बसत आहे. हद्दी जवळ असलेल्या भागात मोठया प्रमाणात नागरीकरण झाल्याने ग्रामपंचायती त्यांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे या भागात टॅंकरची मागणी वाढली आहे. खासगी टॅंकर चालकांकडून पालिकेकडून हे पाणी उपनगरासाठी घेऊन हद्दी जवळील गावात विकले जाते. त्यातच उपनगरांमध्ये महापालिकेचे पाण्याचे जाळे विस्तारलेले नसल्याने या भागातील नागरिकांनाही पालिकेचेही नाही आणि टॅंकरचेही पाणी मिळत नाही, असे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)