स्वारगेट ‘मल्टिमॉडेल हब’ दोन टप्प्यांत होणार

पुढील महिन्यात कामास सुरूवात – महामेट्रोची माहिती

पुणे- स्वारगेट चौकात होणाऱ्या “मल्टिमॉडेल हब’चे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पीएमपीचे राजर्षि शाहू बसस्थानक तसेच त्याच्या जवळील पाणीपुरवठा विभागाची जागा महामेट्रोला देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

स्वारगेट “मल्टिमॉडेल हब’चे काम पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. “मल्टिमॉडेल हब’च्या कामामुळे पीएमपी बसस्थानक स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी लक्ष्मीनारायण टॉकीजसमोरची फिश मार्केटच्या मागील जागा सूचविली आहे.

दरम्यान, या हबसाठी अजून एसटी प्रशासन तसेच पीएमपीच्या मुख्य कार्यालयाची जागाही ताब्यात घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या जागेवरील हबचे काम सुरू केले जाणार असल्याचे दीक्षित म्हणाले. हे काम साडेसात एकर जागेत सुरू होणार आहे. तसेच हा बस थांबा स्थलांतरित केल्यानंतर महामेट्रोला आणखी 1 एकर जागा उपलब्ध होणार आहे.

असे असेल ट्रान्सपोर्ट हब
मल्टिमॉडेल हबअंतर्गत जमिनीखाली चौथ्या स्तरावर (अंडरग्राउंड लेव्हल-4 ) स्वारगेटच्या भुयारी मेट्रो स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. त्यासह, दुचाकी-चारचाकी आणि कॅबसाठी पार्किंग आणि राज्य परिवहन (एसटी) आणि पीएमपीच्या स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्ग असणार आहे. “मल्टिमॉडेल हब’च्या पहिल्या टप्प्यातील संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 200 कोटी रुपये असून, त्यानंतर एसटीच्या ताब्यातील जागेचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

या हबचा आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. सर्व वाहतूक साधने आणि प्रवासी-पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन “मल्टिमॉडेल हब’चा आराखडा तयार केला आहे. जेधे चौकात येणाऱ्या वाहतुकीचा सर्वंकष अभ्यास करण्यात आला. त्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाची (एआरएआय) मदत घेतल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)