स्वाध्यायी युवक करताहेत पथनाट्याद्वारे जन्माष्टमी

कहानी छगन की…’मधून श्रीकृष्णाचे विचार पोहोचविणार घरोघरी
सातारा, दि. 30 : परम पूजनीय पांडुरंगशास्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजात पोहोचावे, या करता देभभरातील 16 राज्यांत तसेच विदेशातही युवकांच्या जवळपास 15 हजार पथकांद्वारे दीड लाखांहून अधिक युवक कहानी छगन की..’ या पथनाट्य करत आहेत.जिल्ह्यातही तीन सप्टेंबरपर्यंत गावोगावी पथनाट्य सुरू आहेत.
पांडुरंगशास्त्री आठवले यांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. गेल्या 17 वर्षांपासून स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्गनाखाली पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत. यावर्षी दीड लाखांहून अधिक युवक कहानी छगन की..’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवत्तृ करत आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगु, पंजाबी, उडिया, बंगाली अशा विविध भाषांमधून ही पथनाट्ये 27 ऑगस्टपासून सुरू झाली असून, ती तीन सप्टेंबरपर्यंत सादर केली जाणार आहेत.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून व या सर्वांतून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करत आहेत. आज आम्हांला असं वेगळं काही करायला वेळच नसतो,’ असे जिथे जागोजागी ऐकू येते त्याच वयोगटातील हे युवक हा उपक्रम करत आहेत. गतवर्षी 2017 मध्ये स्वाध्याय परिवाराच्या या युवकांनी जवळपास 60 हजार ठिकाणी ही पथनाट्ये केली होती. साधारण 50 लाख लोकांनी ही पथनाट्ये पाहिली होती.
आज बऱ्याचदा तरुण प्रलोभनांसमोर झुकताना दिसतो, त्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे विचारांची कमतरता. दुनिया झुकती झुकानेवाला चाहिए,’ अशी अशीच परिस्थिती बहुतांश वेळा पहायला मिळते. पण श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्‍य आहे. मात्र हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत, तरुणांपर्यंत पोहोचतच नाहीत. परिस्थितीला कंटाळून, प्रसंगी परिस्थितीला सपशेल शरण जाऊन संकटांपासून पळण्याचा विचार करताना आजचा तरुण दिसतो. पण कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील हताश, निराश न होता आनंदाने, ताठ मानेने जीवन जगू शकतो, असेच काहीसे विचार या पथनाट्यातून पाहायला दिला जात आहे.

दहीहंडीपेक्षा विचारांची उंची’ महत्वाची
दहीहंडीची उंची व थर यावरच बाष्कळ चर्चा व वादंग करताना आपण श्रीकृष्णाची, त्याच्या विचारांची, दहीहंडीच्या उत्सवाची उंची’ किती खुजी ठरवतोय, याचे भानच समाजात कोणाला राहिले नाही. अशा काळात स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमीनिमित्त सादर होणारी ही पथनाट्ये विधायकतेचा किरण ठरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)