स्वतंत्र भारताच्या इतिहासात मोदी सरकार सर्वाधीक शेतकरी विरोधी – शरद पवार 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे ७ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, आपला पक्ष खूप मोठा नाही पण आपल्याला देशासाठी महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. हे वर्ष खूप महत्वाचे असून संपूर्ण देश लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सांप्रदायिक सरकारला नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत आहे.

यावर्षी, सामाजिक-राजकीय संघर्षाच्या दशा आणि दिशमध्ये बदल होणार आहेत अशी भविष्यवाणी देखील पवारांनी केली. भारताच्या राजकीय व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. आपला देश सांप्रदायिक राजकारणाच्या जाळ्यात अडकला असल्याचे शरद पवार यांनी स्पषट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शरद पवार यांनी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भारताचा मुख्य आधार कृषी आहे मात्र स्वतंत्र भारताच्या इतिहासात मोदी सरकार सर्वाधीक शेतकरी विरोधी राहिले आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1034745200231374848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)