स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीतास मनाई करणाऱ्या मदरशाची मान्यता रद्द

लखनौ (उत्तर प्रदेश) – स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीत गाण्यास मनाई करणऱ्या मदरशाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील महराजगंज येथील मदरसा अरबिया अहले सुन्नत अनवारे तैयबा गर्ल्स कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेने सोमवारी मंजूर केला. त्याचबरोबर मदरसा बोर्डाच्या परीक्षेत सुधारणांसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

अध्यक्ष एम ए सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या बैठकीत महराजगंज मदरशाचे प्रकरण मांडण्यात आले होते. बैठकीत रजिस्ट्रार एस एन्‌ पांडेय यांनी सांगितले, की संबंधित मदरशाची मान्यता 20 ऑगस्टपासून काढून घेण्यात आली आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्याच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली असून मदरशात विरोधामुळे राष्ट्रगीत गायिले गेले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रसंगी मदरसा व्यवस्थापन समितीचा कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता. यावरून मदरसा चालवण्यात व्यवस्थापनास काहीही रुची नसल्याचे दिसून आले. मदरशात विद्यार्थ्यांची आणि वर्गांची संख्याही मानकानुसार नव्हती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मदरशाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिनि आयटीआय योजने अंतर्गत यापुढे मदरशांबाहेरचे अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनीही शिक्षण घेऊ शकतात. राज्यात चालू असलेल्या 127 मिनि आयटीआयमध्ये आजवर केवल मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकत होते.यानंतर त्यात यूपी बोर्डासहीत अन्य बोर्डांचे अम्पसंख्य विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. मदरशांसाठी मान्यता अर्ज, त्यांची पडताळणी, मान्यता आणि विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)