स्वाजीलॅंडचे नाव आता “द किंगडम ऑफ इस्वातिनी’

राजाने अचानक बदलले देशाचे नाव

लोंबाबा (स्वाजीलॅंड) – स्वाजीलॅंडच्या राजाने आपल्या देशाचे नाव अचानक बदलून “द किंगडम ऑफ इस्वातिनी’ असे केले आहे. स्वाजीलॅंडच्या 50व्या स्वातंत्र्य दिनी झालेल्या एका कार्यक्रमात स्वाजीलॅंडचे राजे तिसरे मस्वानी यांनी आपल्या देशाचे नाव बदलल्याची घोषणा केली.

त्यांच्या या अचानक घोषणेने सर्वांना धक्काच बदला. स्वाजीलॅंडचे नाव बदलण्याची कल्पना स्वाजीलॅंडच्या राजेसाहेबांच्या मनात असल्याची जाणीव लोकांना पूर्वीपासून होती, पण ते असा अचानक निर्णय घेऊन नाव बदलल्याची घोषणा करतील असे कोणाला वाटले नव्हते. स्वाजीलॅंडचे नाव स्वित्झर्लंडशी मिळतेजुळते असल्याने लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होईल असे त्यांना वाटत होते.देशाने नाव बदलण्यामुळे अनेक नागरिक नाराज झाले आहेत. देशाचे नाव बदलण्यापेक्षा देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही तरी केले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)