‘स्वाईन फ्ल्यूची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी त्वरीत पाऊले उचला’

आ. शिवेंद्रसिंहराजे; जिल्हा शासकीय रुग्णालयात केले मास्कचे वाटप
सातारा- सातारा शहर आणि परिसराला स्वाईन फ्ल्यू या गंभीर साथीच्या आजाराने विळखा घातलेला आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी त्वरीत पाऊले उचला अशी सुचना करुन यासाठी लागेल ती मदत आपण करु, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सांगितले.

स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. या गंभीर बाबीचा आढावा घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सर्व वार्डची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी रुग्ण आणि नातेवाईकांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र चोरगे, चंदन घोडके, विलास कासार, मुस्ताक सय्यद, विजय देशमुख, डी. पी. शेख, अस्लम कुरेशी, सुरेश अंबवले (गुरुजी), दिपक चोरगे, महेश यादव, राहूल धनावडे, विक्रम ढोणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला माने, डॉ. व्यंकटेश गौर, डॉ. कारखानीस आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत स्वाईन फ्ल्यूबाबत चर्चा केली. औषधांच पुरेसा साठा उपलब्ध आहे का? या आजारावरील लस रुग्णालयात उपलब्ध आहे का? आदी सर्व बाबींचा आढावा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी घेतला.

नेहमीपेक्षा यंदा यावर्षी स्वाईन फ्ल्यू या साथीचा फैलाव खुपच वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. त्वरीत साथ आटोक्‍यात येण्यासाठी योग्य त्या उपाय योजना रुग्णालय प्रशासनाने कराव्यात. तसेच बाधीत रुग्णांना औषधे आणि लस उपलब्ध करुन त्यांच्यावर तातडीने उपचार केले जावेत. याबाबत कोणतीही हयगय करु नये. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी कोणतीही मदत लागली तरी सांगा, आपण सर्वोतोपरी सहकार्य करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)