“स्वाईन फ्लू’ने महिलेचा मृत्यू

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने बुधवार (दि. 26) चाकण येथील एका 35 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, शहरात तीन बाधित रुग्ण आढळले असून 43 रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत.

“स्वाईन फ्लू’ने जानेवारीपासून अद्यापपर्यत 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या 180 वर पोचली आहे. शहरात या आजाराने मृत्यूमुखी पडणारे व बाधित रुग्णांचा आकडा सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे “स्वाईन फ्लू’, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे अनेक बाधित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात या भयग्रस्त आजाराचे वाढते रुग्ण पाहता नागरिकांमध्ये चिंताग्रस्त वातावरण आहे. यासाठी, महापालिकेचा आरोग्य विभागाने स्वाईन फ्लू आजाराला रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्वाईन फ्लू’चा आजार रोखण्यासाठी महापालिका शहरात ठिक-ठिकाणी जाऊन नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन जनजागृती करत आहे. तसेच, शहरात महापालिकेच्या रुग्णालयात “टॅमी फ्लू’ची लस मोफत उपलब्ध असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)