स्वयंअर्थसहायित, खासगी विद्यापीठांमध्येही इबीसी लागू करा’

पुणे- शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेमध्ये सर्व विभागाच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व सर्व अभ्यासक्रमाचा सरसकट समावेश करावा तसेच खासगी अभिमत किंवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्येही ही योजना लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाला पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविलेली शिष्यवृत्ती योजना ही काही अभ्यासक्रमांनाच लागू असल्याचे दिसते आहे. तसेच पदव्युत्तर पदवीचे शुल्कही अनेकदा काही लाखांमध्ये असते, त्यामुळेच त्यांनाही ही शिष्यवृत्ती योजना लागू करावी अशी मागणी मनविसेकडून करण्यात आली आहे. त्यामुळेच सर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमाचा तसेच सर्वच शैक्षणिक संस्था, विद्यापीठांना ही शिष्यवृत्ती योजना लागू केली जावी अशी मागणी मनविसेकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)