स्वमूल्यमापन अहवालात त्रुटीची बाधा

अनेक महाविद्यालये बेफिकीर

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालये व संस्थांना स्वमूल्यमापन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, बहुतांश महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. याउलट अनेक महाविद्यालयांनी अद्यापही स्वमूल्यमापन केलेले नसल्याचे दिसून आले.

पुणे विद्यापीठाने दि. 9 मेपर्यंत स्वमूल्यमापन अहवाल सादर करण्याबाबत महाविद्यालयांना मुदत दिली होती. या मुदतीत अनेक महाविद्यालयांनी आपले अहवाल तयार करून शैक्षणिक विभागाकडे सादर केले. मात्र, प्राप्त अहवालांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. काही महाविद्यालयांनी अभ्यासक्रमनिहाय शिक्षकांची माहिती दिलेली नाही. प्राचार्य, संचालक, शिक्षकांच्या मान्यतेविषयी माहिती सदोष किंवा अपूर्ण आढळून आली. एकाच शिक्षकाचे नाव एकाहून अधिक अभ्यासक्रमांसाठी दर्शविण्यात आले आहे. तर काही शिक्षकांची मान्यतापत्रे ते पूर्वी कार्यरत असलेल्या महाविद्यालयांची आहेत. यांसह अन्य काही त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतीत अहवालच सादर केलेले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे शैक्षणिक विभागाने स्वमूल्यमापन अहवाल संबंधित समितीपुढे सादर करण्याबाबत महाविद्यालयांना पुन्हा मुदत दिली आहे. त्यानुसार पुणे शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांना दि.29 मे रोजी, अहमदनगरमधील महाविद्यालयांना दि. 30 मे रोजी तर नाशिक मधील महाविद्यालयांना दि. 31 मे रोजी समितीपुढे आवश्‍यक कागदपत्रांसह हजर राहावे लागणार आहे. सकाळी 11 ते 2 व दुपारी 2.30 ते 5 यावेळेत कागदपत्रांची तपासणी करून अहवाल घेतले जाणार असल्याचे शैक्षणिक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)