स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेत बळ येणार का?

नोंद।मुकुंद फडके

दिवाकर रावतेंच्या कानपिचक्‍यानंतर पदाधिकाऱ्यांनी जागे होण्याची गरज
सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे प्रत्येक व्यासपीठावर स्वबळाचा नारा देत असताना सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला मात्र आपले बळ शोधावे लागत आहे.शिवसेना नेते आणि मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्‍यांनंतर तरी पदाधिकारी जागे होउन कामाला लागतील का असा सवाल केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुमच्यात सामर्थ्य नसेल तर पदावरुन बाजुला व्हा असा स्पष्ट संदेश रावते यांनी दिला असल्याने आता लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आणि विधानसभा निवडणूक वर्षावर आली असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपले बळ दाखवावेच लागणार आहे.इतर राजकीय पक्षांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली असताना शिवसेनेत मात्र सामसूम दिसत असल्याने रावते यांनी पक्षाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढणे साहजिकच आहे.या मेळाव्यात पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने जिल्हा शिवसेनेत सामर्थ्य आहे की नाही याची शंका रावते यांना येणेही रास्त आहे.शेजारच्याच कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत.तेथील पक्ष संघटना बळकट आहे.पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असले तरी पक्षाचे बळ कमी होताना दिसत नाही.इतर राजकीय पक्षातील प्रबळ नेतेही तेथे शिवसेनेत दाखल होउन आमदार झाले आहेत.

सातारा जिल्हा शिवसेनेला ते शक्‍य झालेले नाही.शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपची मात्र त्या दिशेने जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे.एक बुथ 25 युथ मोहीम जोरात सुरु आहे.इतर पक्षातील प्रभावी नेते भाजपमध्ये येउ लागले आहेत.भाजपने जाणीवपूर्वक सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.राष्टृवादी आणि कॉंग्रेस हे पक्षही आंदोलने आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेर राहिले आहेत.शिवसेनेचा असा कोणताही कार्यक्रम दिसत नाही किंवा कोणतेही आंदोलन प्रभावीपणे झालेले दिसत नाही.म्हणूनच रावते यांना जिल्हा शिवसेनेच्या बळाबाबत शंका आहे.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेला न्याय द्यावयाचा असेल तर प्रथम पक्ष संघटनेत बळ आणण्याची गरज आहे.गावपातळीवरील शिवसैनिकापासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आता जागे व्हावे लागणार आहे असा संदेश निश्‍चितच रावते यांच्या या दौऱ्याने दिला आहे.

स्वबळाची भाषा रावतेच विसरले
शिवसेनेच्या या मेळाव्यात बोलताना दिवाकर रावते यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांनी बिनविरोध निवडून यायला हवे असे विधान केले.या विधानामीुाल त्यांची भावना चांगली असली तरी त्यामुळे शिवसेनेच्या राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवण्याच्या धोरणालाच छेद जातो याचा विसर मात्र रावते यांना पडला.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात सर्व 48 जागा लढवण्याची घोषणा केली आणि गणेशोत्सवापुर्वी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचेही संकेत दिले.पण आता साताऱ्याबाबत शिवसेनेचे धोरण काय हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच जाहीर करायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)