#Video: स्वप्ने पूर्ण न केल्यास लोक झोडपतात – गडकरी

मुंबई – निवडणूकीपूर्वी राजकीय नेते नागरिकांना स्वप्ने दाखवतात. मात्र ही स्वप्ने पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनता खुले झोडपते, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. आपण लोकांना कोणतेही स्वप्न दाखवत नाही आणि जी दाखवतो ती स्वप्ने आपण पुर्ण करतो, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की स्वप्ने दाखवणारे नेतेच लोकांना जास्त आवडतात. पण दाखवलेले स्वप्न पूर्ण केली नाहीत तर लोक त्यांना मारतातही. त्यामुळे स्वप्न तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतात. मी जे बोलतो, ते 100 टक्के पूर्ण करतो, असे गडकरी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीही गडकरी यांनी आपल्या वक्तव्यातून भाजपाने 2014 मध्ये जाणूनबुजून खोटी आश्वासने दिल्याचे नमूद केले होते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सत्तेवर येणार नाही याचा आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लोकांना मोठमोठी आश्‍वासने दिली होती. आता जेव्हा आम्ही सत्तेत आलो आहोत. तर लोक दिलेल्या आश्वासनांची आम्हाला आठवण करून देतात त्यामुळे आम्हाला केवळ हसून वेळ मारून न्यावी लागते, असे म्हटले होते. आजही असेच त्यांनी वक्तव्य करून मोदींनाच लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)