स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय निर्मितीला वेग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या निर्मितीची चक्रे चांगलीच फिरू लागली असून आयुक्‍तालयाच्या जागेच्या निश्‍चिती बरोबरच शुक्रवारी मध्यरात्री अप्पर पोलीस आयुक्त दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे पहिले अप्पर पोलीस आयुक्त होण्याचा मान मकरंद रानडे यांना मिळाला आहे. रानडे हे ठाणे पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून कार्यरत होते. तर महासंचालक मुंबई येथून नम्रता पाटील यांची तर औरंगाबादचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे.

महापालिकेने नुकतीच चिंचवड येथील महापालिकेच्या महात्मा फुले या शाळेची जागा आयुक्तालयाला मान्य केली आहे. त्यानुसार इमारतीचे रंगकाम पूर्ण झाले आहे. नियोजनानुसार 15 ऑगस्ट रोजी होणे अपेक्षीत आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकुण 15 पोलीस स्टेशन कार्यरत राहणार असून त्यामध्ये सध्या पुणे आयुक्तालयातील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी, चिखली या पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे. तर पुणे ग्रामीणच्या हद्दीतील चाकण, आळंदी, देहुरोड, तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी ही पोलीस ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समाविष्ठ केली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आयुक्तालयासाठी एकूण 4 हजार 840 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 हजार 207 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस दलातील एक पोलीस उपायुक्‍त, एक सहाय्यक पोलीस आयुक्‍त, 27 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, 82 पोलीस उपनिरीक्षक, 188 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 376 पोलीस हवालदार, 371 पोलीस नाईक, 781 पोलीस शिपाई आणि 6 अकार्यकारी दल (मंत्रालयीन कर्मचारी व वर्ग-4) अशा एकुण 1 हजार 855 जणांना पिंपरी-चिंचवडच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येणार आहे. तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस उपायुक्‍त (अप्पर अधिक्षक), एक सहाय्यक आयुक्‍त (उपविभागीय अधिकारी), 4 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक निरीक्षक, 13 पोलीस उपनिरीक्षक, 34 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 79 पोलीस हवालदार, 89 पोलीस नाईक आणि 127 पोलीस शिपाई अशा एकूण 352 जणांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात नेमणूक करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस दलातील 1 हजार 855 आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील 352 अशा एकूण 2 हजार 207 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात लवकरच नियुक्‍ती होणार आहे.

आयुक्‍तालयासाठी लागणारी 2 हजार 633 ही पदे आगामी 3 टप्प्यात निर्माण करण्यात येणार आहेत. नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यात (2 हजार 633 पदे) आयुक्‍त, अप्पर आयुक्‍त, 2 उपायुक्‍त, 7 सहाय्यक आयुक्‍त, 24 पोलीस निरीक्षक, 36 सहाय्यक निरीक्षक, 65 उपनिरीक्षक, 88 सहाय्यक उपनिरीक्षक, 174 पोलीस हवालदार, 336 पोलीस नाईक आणि 744 पोलीस शिपाई एवढी पदे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 7 पीआय, 14 एपीआय, 29 पीएसआय, 32 एएसआय, 61 हवालदार, 114 पोलीस नाईक आणि 259 पोलीस शिपाई तर तिसऱ्या टप्प्यात 5 पीआय, 8 एपीआय, 26 पीएसआय, 31 एएसआय, 55 हवालदार, 112 पोलीस नाईक आणि 252 पोलीस शिपाई यांची पदे निर्माण केली जाणार आहेत.

14 पोलीस निरिक्षकांच्या नियुक्‍त्या
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी 14 पोलीस निरिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये यशवंत नामदेव गवारी (कोल्हापूर), राजेंद्र जयंत निकाळजे, भानुदास अण्णासाहेब जाधव, दिलीप तुकाराम भोसले, सुनील रंभाजी दहिफळे (मुंबई शहर), संजय वामनराव निकम (पुणे शहर), पांडूरंग बाबासाहेब गोफणे (रायगड), सतिश विठ्ठल पवार (कोल्हापूर), सुनील विष्णू पवार (अहमदनगर), सुधाकर पंडीराव काटे, टी. वाय. मुजावर (सीआयडी), श्रीराम बळीराम पौड (राज्य गुप्तवार्ता विभाग), अजय विनायकराव जोगदंड (दौंड), आणि प्रदीप उत्तम लोंढे (मुंबई शहर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)