स्वच्छ सर्वेक्षण पथकाकडून पाहणी पूर्ण

पिंपरी – शहरात स्वच्छ सर्वेक्षण पथकांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. पथकाने नागरिकांच्या समक्ष भेटी घेऊन स्वच्छतेबद्दल त्यांचे मत जाणून घेतले. नागरिकांच्या 31 तारखेपर्यंत प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहेत. संबंधित पथकाकडून केंद्र सरकारकडे त्याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याचा निकाल लागेल.

शहरामध्ये 21 ते 24 तारखेदरम्यान स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. 23 आणि 24 तारखेला स्टार गुणांकनासाठी सर्वेक्षण झाले. तर, शहरातील विविध भागांमध्ये 21 ते 23 तारखेदरम्यान भेटी देऊन पाहणी करण्यात आली. दोन पथकांतर्फे ही पाहणी करण्यात आली. पहिल्या पथकात 13 तर, दुसऱ्या पथकात 6 जणांचा समावेश होता. स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहराच्या विविध भागांतील स्वच्छतागृहांची पाहणी केली गेली. त्यामध्ये प्रामुख्याने “क’ आणि “इ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या स्वच्छतागृहांची प्राधान्याने पथकाने पाहणी केली. त्याशिवाय, 32 निवासी स्थानांची तपासणी केली. पदपथ, रेल्वे स्थानक, व्यावसायिक ठिकाणे आदींचा समावेश होता. नागरिकांना प्रश्‍नावली देऊन त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्याशिवाय, मोशी कचरा डेपो येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली.

दरम्यान, 31 तारखेपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरिकांचा फीडबॅक घेतला जाणार आहे. त्यासाठी सहा हजारपैकी दीड हजार गुण आहेत. देशभरात दहा लाखांपेक्षा आधिक लोकसंख्या असलेल्या 53 महापालिका आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते व चौक याठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत 48 नगर गॅन्ट्रीद्वारे छपाई करून लावण्याचे कामकाज थेट पद्धतीने देण्यात आलेले आहे. त्यासाठी एक लाख रूपयांच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती समोर मंजुरीसाठी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here