स्वच्छ सर्वेक्षणासाठी पुणे पालिकेने कसली कंबर

10 अधिकाऱ्यांनी केला इंदोर शहराचा दौरा

पुणे स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेचे घसरलेले मानांकन सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. सलग तीन वर्षे देशात स्वच्छतेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या इंदोर शहराच्या स्वच्छतेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या 10 अधिकाऱ्यांनी नुकताच 2 दिवसांचा इंदोर दौरा केला.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत देशातील स्वच्छ शहरात महापालिकेचा क्रमांक 10 वरून थेट 37 वर गेला आहे. या सर्वेक्षणासाठी 2 सल्लागार नेमूनही महापालिकेचे मानांकन घसरल्याने पालिका प्रशासनान या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आणि चांगले काम करूनही टीकेचा सामना करावा लागला होता. त्यातच या कामासाठी पालिकेने 2 स्वतंत्र सल्लागारही नेमले होते. त्यामुळे पालिकेची नेमकी काय चूक झाली आणि इंदोर शहराकडून या सर्वेक्षणासाठी कशा प्रकारे वर्षभराचे नियोजन केले जाते. याची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख 10 अधिकाऱ्यांचे पथक दोन दिवसांच्या इंदोर दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर पुढील वर्षभर पालिकेत कशा प्रकाचे स्वच्छ सर्वेक्षणासाठी उपाययोजना करता येतील याचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावर्षीपासून सर्वेक्षणात बदल
केंद्राकडून यावर्षीपासून सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी वर्षाच्या अखेरीस डिसेंबर व जानेवारीत हे सर्वेक्षण होत असे मात्र, आता प्रत्येक महिन्याला केंद्राने स्वच्छ सर्वेक्षणाचे निकष ठरवून दिले असून त्याची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, या महिन्यांच्या निकष पूर्तीवरच वर्षाच्या अखेरीस एकत्रित गुणांकन केले जाणार असून त्यावर शहराचे स्वच्छतेचे मानांकन ठरणार आहे. त्यामुळे पालिकेने पहिल्या महिन्यापासूनच या सर्वेक्षणासाठी कंबर कसली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.