‘स्वच्छ पुणे’चे ट्‌विटरवर वाभाडे

पालिकेच्या प्रश्‍नावर पुणेकरांचा नकारात्मक प्रतिसाद

पुणे – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. पण, स्वच्छतेबद्दला ठोस आणि कायमस्वरूपी उपाय न करणाऱ्या प्रशासनाचे पुणेकरांनी ट्‌विटरवर अक्षरश: वाभाडे काढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने गेल्या काही दिवसांत शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी, जनजागृती सुरू केली आहे. पण, कचरागाडी वेळेत न येणे, कचरा वर्गीकरण न करणे, कचऱ्यावर प्रक्रिया न करणे अशा समस्या प्रशासनाची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. तर, अनेक ठिकाणच्या कचराकुुंड्या ओसंडून वाहत असून त्याचा दुर्गंध सुटत आहे. याचे बोलके उदाहरण मंगळवारपेठेत नक्‍की पाहण्यास मिळेल. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करत पालिका प्रशासन फक्‍त गवगवा करण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे.

“शहरातील स्वच्छतेबाबत समाधानी आहात का?’ असा प्रश्‍न प्रशासनाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दि.22 जानेवारी रोजी विचारला होता. त्यावर काही नागरिकांनी समस्या सांगितल्यास त्यावर उपाय शोधण्याचे आश्‍वासन या उत्तराच्या माध्यमातून दिले जात आहे. पण, काही नागरिकांनी मूळ समस्यांवर बोट ठेवल्यास त्याला उत्तर देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे या अभियानातील फोलपणा फक्‍त रंगरंगोटीपुरताच असल्याचे स्पष्ट होत आहे.

…मग काय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू का?
पालिकेने स्वच्छतेसंदर्भात पुणेकरांनी मते मागविली असता एका युजरने म्हटले आहे, “मी दि.19 जानेवारी रोजी माझ्या परिसरातील स्वच्छतेबाबत तक्रार केली होती. पण, पालिकेने त्यावर काही कारवाई केली नाही. मग मी आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू का?’ असा उद्विग्न सवाला या नागरिकाने विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)