स्वच्छता ही सेवा उपक्रमात सातारा पालिकेचा दिव्याखाली अंधार..

गुरुनाथ जाधव

सातारा, दि. 29 – स्वच्छता ही सेवा पंधरावडा सर्वत्र साजरा केला जात असताना. दिव्याखाली अंधार पाहायला मिळाला. एका बाजूला सातारा जिल्ह्य परिषदेचा देशात डंका तर दुसऱ्या बाजूला सातारा नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू सोबत डेंगूच्या साथीचा फैलाव झाल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन या बाबत नागरिकांना स्वच्छता पाळण्याचा संदेश देत आहे. विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, संस्था स्वच्छता ही सेवा कृतीतून दाखवत आहेत. मात्र सातारा नागरपरिषदेत हा उपक्रम कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सातारा नगरपरिषदेच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अडगळीच्या ठिकाणी साहित्य टाकल्याने, तसेच पाणी साचल्याने डेंगू सदृश डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. या मुळे सातारा नगर परिषदेच्या मुख्य इमरतीखाली प्राधान्याने स्वछता करणे आवश्‍यक बनले आहे. सातारा नगरपरिषदेचा आरोग्य विभाग येनकेन प्रकारे चर्चेत असतो. शहरातील कचरा समस्या किंवा अन्य प्रकारे सतत या विभागाच्या तक्रारींचा पाढा कायमच वाचल्याचे पहायला मिळते. मुख्याधिकरी शंकर गोरे यांनी याकडे कायमच दुर्लक्ष केलेले आहे. साताराच्या नगराध्यक्षा माधवी कदम स्वच्छता उपक्रमात सहभागी घेऊन पालिका स्वच्छ करतील याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक भागातील भाग निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांनी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकसहभाग देखील महत्वाचा आहे. संबधित ज्या व्यक्तींनी या ठिकाणी साहित्य ठेवले आहे त्याची माहिती घेऊन सदर परिसर स्वच्छ करण्यात येईल.
मुख्याधिकारी शंकर गोरे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)