स्वकीयांनीच दिला धोका; पराभवानंतर जया प्रदांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशमधील चर्चित रामपूरच्या जागेवर समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदविला. तर अभिनेत्री व भाजप उमेदवार जया प्रदा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर पहिल्यांदाच जया प्रदा यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. स्वकीयांनीच धोका दिल्याचे जया प्रदा यांनी म्हंटले आहे.

जया प्रदा म्हणाल्या कि, मी जनतेची आभारी आहे. सोबतच सर्व कार्यकर्त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करते. मी रामपूर जागेवर विजयी होईल, अशी आशा मला होती. परंतु, दुर्देवाने स्वकीयांनी धोका दिला. विरोधी पक्षाची मदत केली आहे, अशी आशा मला त्यांच्याकडून नव्हती, असे त्यांनी म्हंटले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, निवडणुकीत विजय-पराजय चालूच असतो. त्याला मी स्वीकारते. १७ दिवसांत कोणी जिंकण्याची आशा ठेवत नाही. परंतु मी ठेवली होती. कारण मला रामपूरच्या जनतेवर आणि महिलांवर विश्वास होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मला मते दिली, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here