स्मृती मंधाना व शिखर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेट संघातील तडाखेबाज खेळाडू स्मृती मंधाना आणि पुरुष संघातील आक्रमक सलामीवीर शिखर धवन यांच्या नावांची शिफारस केली आहे. भारतीय पुरुष संघातील सलामीवीर शिखर धवन हा सध्या आयपीएल मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळत असून मागील वर्षभरात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

तसेच महिला संघातील धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधानाने आतापर्यंत संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली असून सर्व संघांविरुद्ध धावा केल्या आहेत. मंधानाने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने महिला विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच बरोबर मागील महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यात तिने पाच अर्धशतके झळकावत सुरेख कामगिरी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)