स्मार्ट सिटी पुरस्कारांवर पुण्याची मोहोर

महापालिकेला म्युनिसीपल बॉन्ड या संकल्पनेसाठी गौरविण्यात आले आहे. तर स्मार्ट सिटीला स्मार्ट प्लेसमेकिंग, लाईटहाऊस, स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंग आणि पीएमसी केअर या प्रकल्पांसाठी गौरविण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रीहरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी हे पुरस्कार स्विकारले.

पाच पुरस्कारांनी पुणे स्मार्ट सिटी आणि महापालिकेचा गौरव

पुणे : केंद्र सरकारच्या वतीने स्मार्ट सिटींसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारांपैकी चार पुरस्कार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पटकावले आहेत. तर पुणे महापालिकेला समान पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या म्युनिसीपल बॉन्ड या संकल्पनेसाठी गौरविण्यात आले आहे. तर स्मार्ट सिटीला स्मार्ट प्लेसमेकिंग, लाईटहाऊस, स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंग आणि पीएमसी केअर या प्रकल्पांसाठी गौरविण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रीहरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी हे पुरस्कार स्विकारले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

या पुरस्कारांमुळे पुणे शहराला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून, पुणेकर नागरिकांसाठी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारांमुळे आणखी जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. – मुक्ता टिळक ( महापौर)

या वेळी माजी आयुक्त आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी हे महापालिकेच्या मुख्यलेखापाल उल्का कळसकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी कुलकर्णी, लाईट प्रकल्पाचे समन्वंयक गणेश सोनुने उपस्थित होते . स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाकडून मूल्यांकन, परिमाणांनुसार कामाचे प्रमाणीकरण आणि परीक्षण करून मूल्यांकन प्रक्रियेद्वारे या पुरस्कारांसाठी या निवडी करण्यात आलेल्या आहेत.

 

 

 राष्ट्रीय पातळीवर अकरापैकी चार पुरस्कार मिळवून पुणे शहराने पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. स्मार्ट सिटी होण्यामध्ये अधिक चांगले जीवनमान, लवचिकता ठेवत पुणे वाटचाल करत आहे याचा हा प्रत्यय आहे. यामुळे पुणेरीपण जपत स्मार्ट सिटी मिशनचे ध्येय गाठण्यासाठी काम करण्याचा उत्साह वाढला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांना नियमित पाठिंबा दर्शवणाऱ्या पुणेकर नागरिकांच्या विश्‍वासाची पावती आहे. – डॉ. राजेंद्र जगताप ( मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)