स्मार्ट सिटीच्या हॅकेथॉनला सुरुवात

देशभरातून 650 हून अधिक प्रस्ताव दाखल

पुणे, दि.29 : पुणे स्मार्ट सिटीमध्ये नवकल्पना आणि नवनिर्मितीची संस्कृती रुजवण्याचा आमचा मानस आहे, आणि ही हॅकेथॉन स्पर्धा म्हणजे त्या दिशेने जाण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा नाविन्यूपर्ण वापर करून स्मार्ट सिटीसाठी चांगल्या उपाययोजना या हॅकेथॉनमधून समोर येतील, असा विश्‍वास पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे स्मार्ट सिटी, नीती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठात प्रथम स्मार्ट सिटी हॅकेथॉन स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल 650 प्रस्ताव दाखल झाले आहेत. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, नागरी सुरक्षा, माहिती आणि तंत्रज्ञान, पाणीपुरवठा अशा वेगवेगळ्या पाच विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली आहे. त्यात देशभरातील 3 हजार 200 जणांनी नोंदणी केली असून 650 सबमिशन करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले 48 संघ पुढील 36 तासांपेक्षा अधिक वेळ त्यांच्या उपाययोजनांच्या प्रस्तावावर पुणे विद्यापीठात काम करतील. विजेत्या संघांना पंचांनी निवडलेल्या दोन फेऱ्यानंतर 30 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)