स्मार्ट सिटीचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत करार

पुणे – डेटावर आधारित संशोधन तथा नवनिर्मितीच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) बंगळूरस्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी औपचारिकपणे सहकार्य करार केला आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून आगामी काळात विविध डेटाप्रणित नवनिर्मितीचे (इनोव्हेशन) उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरांच्या विकासासाठी डेटाची देवाण-घेवाण करण्यासाठी सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने “भारतीय शहरी डेटा एक्‍सचेंज (आययूडीएक्‍स)” स्थापन करण्यात आले आहे, ओपन एपीआय, डेटा मॉडेल आणि सुरक्षा, गोपनीयता आणि अकाउंटिंग यंत्रणेच्या अंतर्निहित फ्रेमवर्कवर आधारित एक पूर्णपणे मुक्त स्रोत निर्माण झाल्याने शहरी डेटाची सोपी आणि कार्यक्षम देवाण-घेवाण व्हावी हा यामागील उद्देश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयआयएससी ही भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत शिक्षण आणि संशोधनासाठीची अग्रगण्य संस्था 1909 पासून कार्यरत आहे. पुणे स्मार्ट सिटीचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि शहर पातळीवरील इतर विविध अॅप्लिकेशन्समधून डेटा प्राप्त करून या संस्थेच्या सहयोगाने शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. डेटाप्रणित विकासकामांसाठी केंद्रीय शहरी कार्ये मंत्रालयाचे इंडियन अर्बन डेटा एक्‍सचेंज (आययूडीएक्‍स) हे व्यासपीठ आहे. आययूडीएक्‍स आणि पुणे पोलिस व इतर विभागांसह सयुक्त विद्यमाने विशिष्ट यशस्वी प्रयोग (यूज केसेस) राबविण्यासाठी इंस्टिट्यूट ऑफ सायन्स आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या सहयोगाने हा पुढाकार घेण्यात आला आहे.

डेटासंबंधीच्या पुढाकारामध्ये भागीदार म्हणून आयआयएससी संस्थेची साथ लाभत आहे ही पुण्यासाठी जमेची बाजू आहे. या भागीदारीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या क्षमतेच्या आधारे नाविन्यपूर्ण स्मार्ट प्रकल्प राबविण्यात पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे आयडिया फॅक्‍टरी फाउंडेशनला मोलाची मदत होईल.
– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)