स्मार्ट व्हिलेजच्या जिल्हास्तरीय समितीकडून पांगारीची पाहणी

पाचगणी -पांगारी (ता. महाबळेश्वर) गावाची स्मार्ट व्हिलेज अंतर्गत जिल्हास्तरीय कमिटीकडून आज तपासणी करण्यात आली. गावाच्या विविध उपक्रमांची पाहणी करून या कमिटीने ग्रामस्थांचे कौतुक केले. या कमिटीत सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेख वित्त अधिकारी धर्मेंद्र काळोखे, बांधकाम उपअभियंता महेश गोंजारी, विस्तारधिकारी शंतनू राक्षे,सहाय्यक गटविकासअधिकारी सांगळे हे होते.

या कमिटीने दप्तर तपासणी व मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी केली. तसेच पांचगणी व महाबळेश्वर शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी पांगारी हे गाव असल्याने पर्यटनस्थळावर येणारे पर्यटक आपल्याही गावाकडे यावेत यासाठी ग्रामस्थानी नव्याने विकासित”वंडर पॉइंट’ ची पाहणीही यावेळी केली. तसेच या कमिटीच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पांगारी हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले असून पृथ्वीवरील हा जणू स्वर्गच आहे. ग्रामस्थानी एकजुटीने फळबाग लागवाडीसारखे विविध पथदर्शी उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हे गाव दुर्गम ठिकाणी वसल्याने गावातच इ. सेवा उपलब्ध करून लोकांना विविध सुविधा देण्यासाठी पावले उचलावीत असे अविनाश फडतरे यांनी सांगून ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पांगारे, पोलीस पाटील मनिषा पांगारे, पांचगणी सोसायटीचे उपाध्यक्ष आनंद पांगारे, माजी सरपंच सर्जेराव पांगारे, पुष्पा पांगारे, राधा पांगारे, नंदा पांगारे मुख्याध्यापक कमल आंबराळे, दिनकर पांगारे, एकनाथ पांगारे, शैलेश पांगारे अक्षय पांगारे उमेश पांगारे, गणेश पांगारे, मधुकर आंबराळे, मंदा पांगारे, कुसुम पांगारे, वनिता पांगारे, राजेंद्र पांगारे, सुमन उंबरकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र पांगारे याना केले तर आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)