स्मार्ट फोनने केलाय तरुणांचा गेम

मोबाईलच्या गेममुळे मुलांचा अभ्यास, युवकांच्या कामाला ग्रहण

शिक्रापूर-सध्या स्मार्ट फोनवरील इंटरनेटच्या माध्यमातून सारख्या नवनवीन गेम उपलब्ध होत असल्यामुळे लहान लहान मुलांपासून मोठे युवक देखील या गेमकडे आकर्षित होत आहेत. दिवस दिवस गेम खेळण्यात युवक वर्ग तसेच लहान लहान मुले मग्न होत असल्यामुळे लहान मुले अभ्यासापासून तर युवक वर्ग त्यांच्या कामापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे नागरिकांना डोळ्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
सध्या सर्वत्र स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र कॉलेज, महाविद्यालय, घरे या ठिकाणी बसलेल्या सर्व मुलांचे डोकेच दिवसभर मोबाईलमध्ये असते. मोबाईलमधील ऍपद्वारे अनेक गेम विनाशुल्क डाऊनलोड होतात. त्यामुळे अनेक युवक वेगवेगळी गेम डाऊऊनलोड करून वापरतात. मुळात मोबाईल वरील इंटरनेटच्या माध्यमातून शिकण्यासारखे खूप काही असतानाही युवक त्याकडे दुर्लक्ष करत असून नको त्या गोष्टीला जास्त महत्व देत आहेत. मोबाईलमध्ये यापूर्वी कॅंडी क्रश, पोकेमॉन, क्वाईन मास्टर तर आता पबजी या गेमने मुलांना वेड लावले आहे. मोबाईलमध्ये व्यस्त झालेल्या मुलांना त्याचा जास्त मोह झाला असून अनेक युवक पाच पाच तास एका गेममध्ये मग्न झालेले असतात. सध्या पबजी गेमच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळे युवक एकत्र येऊन एकमेकांना माहिती देत इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी प्रत्यक्ष बोलून ऑनलाइन गेम खेळत असतात. त्यामुळे गेम खेळणाऱ्या युवकांकडे पाहून शेजारी असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील अचंबित होत आहेत. ही गेम खेळताना लहान मुले त्यांचा अभ्यास तर मोठी मुले देखील त्यांची सर्व कामे तसेच जेवण विसरून गेम खेळण्यात मग्न झालेले असतात. मुलांना मैदानी व शारीरिक खेळांची आवश्‍यकता असताना आज मुले सर्व मैदानी व शारीरिक खेळ विसरले असून कदाचित काही दिवसांनी युवकांना मैदानी खेळांचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे दिसून येऊ शकते. काही काळापूर्वी शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्ट्यांच्या दिवशी युवक वर्ग वेगवेगळे मैदानी खेळ खेळताना दिसत होते; परंतु आता अलीकडील काळामध्ये युवक कोठेही मैदानी खेळ खेळताना दिसून येत नाहीत. तर सर्वत्र मुले मोबाईलच्या माध्यमातून खेळत असल्याचे दिसून येत आहे. काही युवकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये गेम खेळू शकत नसल्याने जुने मोबाईल बदली करून नवीन मोबाईल देखील विकत घेतले आहेत.

 • गेममुळे मोठी करमणूक होते
  सध्या सर्वत्र मोबाईलमधील गेम खेळण्यात व्यस्त असलेल्या युवकांना गेमबाबत माहिती विचारली असता मोबाईलमधील गेममुळे करमणूक होत असून, ऑनलाईन गेम खेळण्यामुळे त्या गेममध्ये खेळणारे सर्वजण एकमेकांशी बोलून खेळतात. त्यामुळे आपण स्वतःच गेम खेळत आहे, असे जाणवते त्यामुळे गेमची जास्त आवड निर्माण होत आहे. गेम खेळण्यामुळे कशाचीही आठवण होत नाही असे गेम खेळणारे युवक आयुब शेख, प्रवीण बामणे, माऊली उगले, विशाल रुके, गुरुदास चंद्रावळे, अर्शलान शेख या युवकांनी सांगितले.
 • सध्या वेगवेगळ्या गेमची मुलांना भुरळ पडत असून मुलांचे शाळेतील अभ्यासाकडे लक्ष नसते. मुलांची मानसिकता बदलली आहे. सध्याच्या शालेय मुलांना काही जुने खेळ हे माहित देखील नाहीत. मुले सध्या मोबाईलमध्ये गुरफटून जात आहेत. त्यामुळे शालेय मुलांना लवकरच डोळ्यांचा त्रास होत असून पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे.
  -अनिल व्यवहारे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक
 • तंत्रज्ञानाचा वापर मुलांनी नवीन माहिती घेणेकामी करावा. तंत्रज्ञानामुळे विचार संकुचित बनू नये, मन चीडचिडे बनू नये. गेम खेळण्यामुळे मुले चिडचिडी होत असता. सध्याच्या गेममुळे मुलांच्या स्वभाव पद्धतीवर त्याचा परिणाम होत असून मुलांनी मोबाईलवरील गेम व खेळ खेळण्यापेक्षा मेहनीचे व मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे.
  -प्राचार्य रामदास थिटे, संभाजीराजे महाविद्यालय जातेगाव
 • सध्या मुलांना मोबाईलच्या तसेच टीव्हीच्या अति वापराने डोळ्यांना कोरडेपणा येत आहे. त्यामुळे मुलांची नजर कमी होत असून त्यांना थकवा जाणवतो. मुलांना तिरळेपणा देखील येऊ शकतो तसेच पुढील काळात मुलांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
  -डॉ. रंजीव कोपुलवार, नेत्रतज्ज्ञ शिक्रापूर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)