“स्मार्ट’सिटीत मुलींच्या जन्मदरात घट

  • 930 वरुन स्त्रीजन्मदर पोहचला 885 वर : चिंतेची बाब

पिंपरी – औद्योगिकनगरीची स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु असताना शहरातच स्त्री जन्माचा दर सातत्याने घटत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शहरात मागील तीन वर्षात स्त्री जन्मदर 930 वरुन घटून तो 885 वर पोहचला आहे. त्यामुळे, सातत्याने घटत असलेल्या स्त्री जन्मदर चिंतेचा विषय ठरत आहे. संपूर्ण राज्यात स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हारताळ फासल्याचे दिसत आहे.

आपल्या वंशाला दिवा हवा, या मानसिकतेमधून स्त्री अर्भकाला गर्भातच खुडण्यात येत होते. अशा घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्य सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कडक कायदे निर्माण केले. मात्र, आजही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने तपासणी करुन लहान अर्भकला गर्भातच खुडण्याच्या घटनात सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे, एक हजार पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाणा मोठ्या प्रमाणात खालावल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला होता. मात्र, मागच्या काही वर्षापासुन शासनाने यामध्ये गांभिर्याने लक्ष घालून ग्रामीण भागासह शहरी भागातही ” बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारखे अभियान राबवुन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागामार्फत वेगवेगळी अभियाने राबवुन सातत्याने याबाबत जनजागृतीही करण्यात येत असते. त्यामुळे काही भागात याचे सकारात्मक परिणात दिसायला सुरवात झाली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगतशील शहरात अशी अभियाने राबवण्यात आली असली तरी त्याचा तितकासा फायदा अद्यापही झालेला नाही. स्त्री जन्मदर वाढण्या ऐवजी तो सातत्याने कमीच होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागच्या चार वर्षात स्त्री जन्माचे प्रमाण कायम राखण्यात प्रशासन पठटर्णपणे अपयशी ठरले आहे. पिंपरी चिंचवड शहरात 2016 साली एक हजार पुरुषांमागे 930 स्त्रीया असा स्त्री जन्माचा दर होता. त्यानंतरच्या दोन वर्षामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पहायला मिळत आहे. 2016 सालच्या स्त्री जन्माचे प्रमाण 2017 साली 13 ने खालावुन ते 917 वर आले. तर मागील वर्षी 2018 साली तर स्त्री जन्माच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात जन्मलेल्या बालकांची संख्या 28 हजार 338 एवढी होती. यामध्ये पुरुष जातीच्या मुलांचे प्रमाण 14 हजार 413 एवढे होते. तर स्त्री जातीची मुले 12 हजार 755 एवढी आहेत. त्यामुळे 2018 साली पिंपरी-चिंचवड शहरात 2018 साली स्त्री जन्माचा दर केवळ 885 एवढाच असल्याचे धक्कादायक चित्र पहायला मिळाला आहे. सातत्याने स्त्री जन्माचे प्रमाण घटत असल्याने हा चिंतेचा विषय बनला असून स्त्री जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्‍यक्ता बनली आहे.

आरोग्य विभागाने प्रभावी कार्य करण्याची गरज
राज्यातील ग्रामिण भागात स्त्री जन्माचा दर वाढवण्यासाठी सरकारकडून विषेश प्रयत्न केले जातात. त्यासाठी जिल्हा परिषेदेची आरोग्य यंत्रणा अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती व आरोग्यसेविका यांची संकल्पना वापरुन काम करीत असतात. जिल्हा पातळीवर या सर्वांना प्रशिक्षण देवून, गावपातळीवर पोहचवण्यात येते. या जनजागृतीमुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्त्री जन्मदर वाढला आहे. मात्र, शहरी भागात अशी यंत्रणा तितकीशी प्रभावी ठरलेली दिसुन आलेली नाही, त्यामुळे पिंपरी-चिंचवड सारख्या शहरातही स्त्रींयाचा जन्मदर कमी होणे, हा चिंतेचा विषय बनला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 2018 साली स्त्री जन्मदर 885 वर आला आहे. सध्या उपलब्ध झालेले आकडेवारी ही संपूर्ण शहराची आहे. त्यामुळे, शहरातील कोणत्या भागात स्त्री जन्माचे प्रमाण कमी आहे, त्या भागात माहिती घेण्यात येईल व स्त्री जन्मदर कमी असलेल्या भागात जनजागृती करुन आवश्‍यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी महापालिकेच्या दावाखान्यातील अधिकारी व कर्मचारीही प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यामध्ये पुढील वर्षात नक्की सुधारणा होईल.
डॉ. पवन साळवे,
अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)