स्मारक उदघाटनाची गर्दी देणार पुन्हा आमदारकीची वर्दी

काळगाव – लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कर्म आणि जन्मभूमित आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून युती शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विविध मंत्री, शिवसेना-भाजपाचे आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आमदार शंभूराज देसाई यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त उच्चांकी गर्दी या समारंभाला नागरिकांची होती. हीच गर्दी आमदार देसाई यांना 2019 ला पुन्हा आमदारकीची वर्दी देणारी ठरणार असल्याची चर्चा संपूर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे.

या महिन्याभरात दोन समारंभ पाटण मतदार संघातील जनतेने पाहिले. या दोन्ही समारंभाची तुलना जनता करीत आहे. यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा उद्‌घाटन सोहळा हाच सरस ठरला असाच निष्कर्ष जनतेने काढला आहे.लोकनेते यांचेवरील प्रेमापोटी व निष्ठेपोटी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेची मांदियाळी समारंभास पहावयास मिळाली. यंदाच्या वर्षी कोयनेला जेवढा पूर आला नाही त्याहून अधिक जनसागर समारंभात पहावयास मिळाला.
आमदार देसाई यांनी गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात केलेल्या अतुलनीय विकासकामांचाही मोलाचा वाटा आहे, असे मानले जाते. समारंभामध्ये खरा सुसंस्कृतपणा दाखविला तो समारंभाचे संयोजक शंभूराज देसाई यांनी. संपूर्ण कार्यक्रमात विरोधकांचे साधे नावही घेतले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदारसंघात देसाई यांना विरोधक आता शिल्लक राहिला नाही अशीच भूमिका सभामंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या मनामध्ये समोरचा जनसमुदाय पाहून झालेली दिसून आली. आमदार शंभूराज देसाई यांनी मी संघर्षातून कसा उभा राहिलो, मला राजकारणातून दुर करण्याचा कुठून आणि कसा प्रयत्न झाला हे सांगत जनसमुदायाची मने जिंकली. त्यांनी स्वत:साठी मुख्यमंत्र्याकडे काहीही न मागता जनहिताच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणात आमदार शंभूराज देसाई हाडाचा नेता आहे. जनतेप्रती त्यांची असणारी भावना मला चांगलीच माहिती आहे. त्यांनी मागावे आणि मी ते द्यावे असे सांगून शंभूराज देसाई यांना माझे कायमच सहकार्य राहणार असल्याची दिलेली ग्वाही उपस्थितांना बरेच काही देवून गेली.

राष्ट्रवादीच्या सभा पाहिल्या तर पक्षाच्या नेत्यांच्या मागून जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती गृहित धरले जाते. आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. बबनराव लोणीकर, ना. विजय शिवतारे, ना. सदाभाऊ खोत, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार धनंजय गाडगीळ, आमदार उल्हास पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार डॉ. गौतम चाबुकस्वार, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नारायण पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार उदय सामंत, माजी आमदार प्रा. सुनिल धांडे या युतीच्या मान्यवरांना निमंत्रित करुन एकाच व्यासपीठावर नेत्यांची मोट कशाप्रकारे बांधता येते हे दाखवून दिले. देसाई यांचा हाच मुसद्दीपणा वाखणण्याजोगा आहे, अशीही चर्चा पाटण मतदारसंघात सध्या सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री बारा आमदारांची उपस्थिती

शताब्दी स्मारक उद्‌घाटन सोहळयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत युती शासनाचे सहा मंत्री तर बारा आमदारांची उपस्थिती आणि त्याहून अधिक पाटण मतदारसंघातील जनतेची अलोट गर्दी ही लक्षणीय होती. पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदारांशी सलोख्याचे संबध असल्यानेच ही मंडळी सभेकरीता उपस्थित होती आणि हीच खरी किमया आमदार शंभूराज देसाई यांची आहे.

यापूर्वीच्या सभांचा विक्रम मोडला

पाटण तालुक्‍यात झालेल्या विविध सभांमध्ये देसाई गटाने कधीही खुर्च्या लावून कोणतीही सभा आयोजित केली नाही. शताब्दी स्मारक उद्‌घाटन प्रसंगी मंडपात भारतीय बैठक ठेवण्यात आली होती. एक एकराच्या मंडपात जेवढी गर्दी होती तेवढेच लोक मंडपाच्या चारी बाजूला उभे होते. तर अनेकांना जागा न मिळाल्याने मंडपाच्या पूर्वेकडील रस्त्यावर सुमारे एक किमी अंतरावर लोक सभा ऐकण्यास बसले होते. या उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक गर्दीने पाटण मतदारसंघातील यापूर्वीच्या सर्वच सभांचा विक्रम मोडीत काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)