स्मशानभूमींचे कामकाज आरोग्यऐवजी वैद्यकीय विभागाकडे

पिंपरी  –पिंपरी-चिंचवड शहरातील 42 स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, गतीमानता, सूसूत्रीपणा यावा; तसेच निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून स्मशानभूमींची जबाबदारी आता वैद्यकीय विभागाकडे अंदाजपत्रकीय तरतुदीसह वर्ग करण्यात आली आहे. या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबादारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे असणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा फेरबदल केला आहे.

महापालिकेच्या शहरात सर्वधर्मियांच्या 42 स्मशानूमी व दफनभूमी आहेत. लिंगायत समाजासाठी एक, मुस्लिम समाजासाठी तीन आणि ख्रिश्‍चन समाजासाठी एक अशा पाच दफभूमी आहेत. या दफनभूमीचे कामकाज त्या-त्या धर्माच्या संस्थाना देण्यात आले आहे. स्मशानभूमी, दफनभूमी वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत. सुरक्षा काळजीवाहक पुरविणे, मयत पास घेवून त्याची नोंद करणे, वैद्यकीय विभागाकडे जमा करणे. उद्यान संबंधित कामकाज, दैनंदिन साफसफाई, स्वच्छता विषयक कामकाज, विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनी, गॅस दाहिनी इत्यादी कामकाज सुरक्षा, आरोग्य, उद्यान, विद्युत व पर्यावरण या विभागांमार्फत करण्यात येत होते. पिंपरी-चिंचवड शहरातील 42 स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, गतीमानता, सूसूत्रीपणा यावा; तसेच निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून स्मशानभूमींची जबाबदारी आता वैद्यकीय विभागाकडे अंदाजपत्रकीय तरतुदीसह वर्ग करण्यात आली आहे. या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबादारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे असणार आहे.

स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजाचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 5 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या कामकाजामध्ये विभागांमध्ये परस्पर समन्वय, कामकाजाचे नियोजन व एकसूत्री नियंत्रणाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्मशानभूमी व दफनभूमीच्या कामकाजात पारदर्शकता, गतीमानता, सूसूत्रीपणा यावा, निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होण्याकरिता, तसेच या कामकाजाचे अधीक्षण, तपासणी व नियंत्रण इत्यादी संबंधित सर्व कामकाज महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे स्थायी स्वरुपात वर्ग करण्यात आले आहे. या कामकाजवर नियंत्रणाची जबाबादारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.