“स्पाईन रस्ता’ बाधितांसाठी “श्रावण गिफ्ट’

78 नागरिकांना भूखंड मिळाला : 128 मिळकतधारक न्यायाच्या प्रतीक्षेत

पिंपरी – स्पाईन रस्त्यामुळे बाधित झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्प्यात भूखंड मिळाला आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1 हजार 250 चौरस फुट भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे स्पाईन रस्ता बाधितांना महापालिका प्रशासनाकडून अनोखे “श्रावण गिफ्ट’ मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृष्णानगर येथील क्रीडा संकुलात सोमवारी “ड्रॉ’ काढून भूखंड सोडत करण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे आदी उपस्थित होते.

पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता तयार केला आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर येथील नागरिकांच्या मिळकती बाधित झाल्या आहेत. त्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने या जागेसाठी प्राधिकरणाकडे 16 कोटी 52 लाख रुपये अगोदरच भरले आहेत. स्पाईन रस्त्यामध्ये 78 नागरिकांची 52 ते 60 मीटर जागा बाधित झाली होती. तर, 128 मिळकत धारकांची 75 मीटर जागा बाधित झाली आहे. या नागरिकांना मोबदला देण्यासाठी तत्कालीन नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार महेश लांडगे यांनी पालिका, प्राधिकरणाकडे त्याच्या पाठपुरावा सुरु केला होता. प्राधिकरणाने बाधितांच्या पुनर्वसनासाठी सेक्‍टर दोन मध्ये प्लॉट आरक्षित केला होता.

प्राधिकरणाने 500, 750 आणि 1 हजार चौरस फुटाने बाधित नागरिकांना जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्याला आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला. एवढ्या जागेत घर बांधणे शक्‍य आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांनी प्रत्येक बाधिताला 1 हजार 250 चौरस फुट जागा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर प्राधिकरणाने सेक्‍टर नंबर 11 मध्ये 1250 चौरस फुटानुसार प्लॉट मंजूर केला होता. त्यामुळे तळवडे, त्रिवेणीनगर मधील बाधितांना भूखंडाचे वाटप करण्याचे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना 13 ऑगस्ट 2018 रोजी दिले होते.

उर्वरित नागरिकांना लवकरच भूखंड
आमदार महेश लांडगे म्हणाले की, स्पाइन रस्त्यामुळे त्रिवेणीनगर मधील अनेक मिळकत धारक बाधित झाले होते. 78 जणांची 50 ते 60 मीटर तर 128 मिळकत धारकांची 75 मीटर मिळकत बाधित झाली होती. या नागरिकांना भूखंड मिळण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. प्राधिकरणाने प्रथम 500, 750 आणि 1 हजार स्क्वेअर फुटाने जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, एवढ्या जागेत घर बांधणे शक्‍य नव्हते. त्यामुळे 1 हजार 250 स्केअर फुटाने जागा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आज 78 बाधितांना जागा मिळाली आहे. उर्वरित बाधित नागरिकांना लवकरच भूखंडाचे वाटप केले जाईल. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)