स्थूलता कशी ठरवली जाते…?

सर्वसामान्यत: व्यक्तीचे वय आणि उंची यांनुसार अपेक्षित असणारे वजन 20 टक्‍क्‍याहून अधिक असेल तर त्या व्यक्तीची स्थूलतेत-लठ्ठपणात गणती होते. शास्त्रीयदृष्टया स्थूलता ठरविण्यासाठी शरीरातील द्रव्यमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्‍स- बीएमआय)’,
अँथ्रोपोमेट्री (त्वचेच्या वळ्यांचा जाडपणा)’, डेन्सीटोमेट्री (पाण्याच्या खालचं मोजमाप)’, कम्प्युटर टोमोग्राफी (सीटी)’ किंवा एमआरआय ऍण्ड इलक्‍ट्रिकल इम्पेडन्स’ अशी वेगवेगळी परिमाणं आहेत.

यात बॉडी मास इंडेक्‍स(बीएमआय) हे परिमाण सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं प्रमाण खालीप्रमाणे:-
वाजवीपेक्षा कमी वजन असलेला:- 18.5 किग्रॅ/मी पेक्षा कमी
सामान्य वजन : 18.5 – 24.9 18.5 किग्रॅ/मी
जादा वजन : 25- 29.9 किग्रॅ/मी
स्थूलता : 30-33 किग्रॅ/मी
अतिस्थूलता : त्यापेक्षा अधिक

तसंच कंबर-नितंब (वेस्ट-हिप) गुणोत्तरसुद्धा स्थूलता ठरविण्यात मदत करू शकतं. स्थूलतेसंबंधित स्कॅंडिनेव्हिया अभ्यासात असं दिसून आलं आहे की, आपल्या शरीरात चरबी आपल्या कमरेभोवती जमा होते. आणि हा प्रकार नितंब आणि मांडीवर जमा होणाऱ्या चरबीच्या प्रकारापेक्षा जास्त घातक असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)