स्थायी’चा पुन्हा “डबल सेंच्युरी’चा प्रयत्न

पिंपरी – कार्यकाळ संपू लागल्याने स्थायी समितीच्या कोटीच्या कोटी उड्डाणांनी आता चांगलाच वेग घेतला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीने पुन्हा दोनशे कोटींचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुन्हा एकदा चऱ्होली, मोशी परिसरावर कृपादृष्टी दाखवत विविध विकास कामांसाठी 64 कोटी 45 लाख 91 हजार दोन रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. गेल्या आठवड्यात याच प्रभागाकरिता 42 कोटी 66 लाख रुपये खर्चास मान्यता दिली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनसाठी आठ दिवसांतच 100 कोटींपेक्षा अधिक खर्च मंजूर झाला आहे. तर मंजूर खर्चाची रक्कम 191 कोटी 76 लाख 39 हजारांवर पोचली आहे.

स्थायी सभागृहात मंगळवारी (दि. 29) पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे 2018 वर्ष फारसे खर्चिक नव्हते. नवीन वर्षाला मात्र धुमधडाक्‍यात सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या स्थायीच्या चार सभांमध्ये तब्बल 820 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर, मंगळवारी (दि. 29) झालेल्या सभेत 191 कोटी 76 लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली. दरम्यान, स्थायी समितीचा कार्यकाळ एक महिनाच शिल्लक राहिला असून उर्वरित काळात केवळ चार सभा होण्याचे निर्धारित असून आणखी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या विषयांना मंजुरी देण्याचा धडाका लावला जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सभेत शहरातील विविध विकास कामांसाठी येणाऱ्या 191 कोटी 76 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. प्रत्येक सदस्याला स्थायी समितीत संधी देण्यासाठी भाजपने “ड्रॉ’मधून वाचलेल्या नगरसेवकांचे देखील गतवर्षी राजीनामे घेतले होते. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना स्थायी समिती वर्षभरासाठीच मिळणार आहे. तर, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फेब्रुवारीअखेर नियमानुसार समितीच्या बाहेर पडणार आहेत.

या समितीच्या पहिल्या दहा महिन्याच्या कार्यकाळात मोठ्या रकमेचे विषय मान्यतेसाठी आले नव्हते. त्यामुळे सदस्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु, नवीन वर्षात मोठ्या रकमेचे विषय स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी येत आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या चार स्थायी समितीच्या सभेत तब्बल 820 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये 4 जानेवारी रोजी झालेल्या स्थायीच्या दोन सभेत तब्बल 358 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली होती. तर, 8 जानेवारी रोजी 57 कोटी, 22 जानेवारी रोजी 213 कोटी आणि मंगळवारी (दि. 29) झालेल्या सभेत तब्बल 191 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सभेत या विकास कामांना दिली मंजुरी
मोशीतील रस्ता विकसित करणे – 12 कोटी 16 लाख
चऱ्होलीतील रस्ता विकसित करणे – 41 कोटी 77 लाख
किवळे रस्ता विकसित करणे – 12 कोटी 22 लाख
विकासनगर रस्ता विकसित करणे – 16 कोटी 24 लाख
वृक्ष प्राधिकरण समितीचा अर्थसंकल्प – 28 कोटी 67 लाख 16 हजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)