स्थानिक युवक दहशतवादाकडे वळण्यात लक्षणीय वाढ

File photo

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – जम्मू-काश्‍मीरमध्ये स्थानिक युवक दहशतवाकडे वळण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी सुमारे 130 युवक विविध दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याची आणि त्यातील मोठ्या संख्येने अल् कायदाकडे वळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 31 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार 131 युवक दहशतवादाकडे वळले असून त्यात दक्षिण काश्‍मीरमधील शॉपियान जिल्ह्यातून सर्वाधिक, 35 असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 126 होता.

अल् कायदाशी संबंधित एजीयूएच (अन्सार गझवत अल हिंद) या दहशतवादी संघटनेत सामील होत आहेत. एजीयूएचचा म्होरक्‍या आहे झाकिर रशीदस भट्ट उर्फ झाकिर मूसा. हा फुलवामा जिल्ह्यातील त्रालजवळच्या एका गावाचा निवासी आहे. हुरियत कॉन्फरन्स या गेल्या 27 वर्षांचा दबदबा कमी करणारा मूसा हा एकमेव दहशतवादी आहे. काश्‍मीरचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यास शिरच्छेद करण्याची धमकी हुरियत नेंत्यास त्याने दिलेली आहे. शरीयत या शहादत ही त्याचीच घोषणा आहे. शरीयत या शहादत ने पूर्वीच्या अनेक घोषणांची जागा घेतली आहे. अन्वर अल अवलाकी या येमेनी-अमेरिकन धर्मगुरूचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे. जम्मू-काश्‍मीरमधील युवा वर्गाला भडकवून दहशतवादाकडे वळवणे हे त्याचा हेतू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शोपियान, पुलवामा, अनंतनागा, कुलगाम आणि अवंतीपोर या पचा जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणावर दहशतवादाकडे वळत असल्याची अणि या पाच जिल्ह्यातून माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)