स्ट्रॉबेरी स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी

संगमनेर : आषाढ शुक्ल पक्ष पौर्णिमा ह्या गुरुपोर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सर्वाचे अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणा-या गुरूला वंदन करण्यासाठी स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री व्यंकटेश एज्यूकेशन सोसायटी संचालित स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूल संगमनेर या शाळेत आज गुरुपोर्णिमा या निमित्ताने  माता-पिता यांचे पद पूजन श्लोक व भक्तीगीता द्वारे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी इ. १० वीतील विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. आई वडील आपल्याला जन्म देतात, तेच आपले संगोपन करतात व प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी शिकवत राहतात. खरे पाहता आई वडील हेच आपले प्रथम गुरु आहेत. सर्वांसाठी आई वडील परमेश्वरा पेक्षाही मौल्यवान असतात. म्हणून प्रत्येकाने त्यांचाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. याकरिता स्ट्रॉबेरी परिवाराने हा आगळा वेगळा उपक्रम राबविला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संज्योत वैद्य यांचे आई-वडील व संस्थेचे खजिनदार डी.एन.काकडे व चंद्रलेखा काकडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यानी आई व वडील यांचे “मातृ पितृ पूजन” केले तसेच आई वडिलांनीत्यांच्या इच्छा मुलांना बोलून दाखवल्या. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचनही मुलांनी या निमित्ताने दिले. या प्रसंगी सर्वच पालक खुप भावुक झiले होते. आई तसेच वडिलांनाही त्यांचे अश्रू आवरणे कठीण झiले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी मा. काकडे ताई यांनी आपल्या शब्दात गुरुची व शिक्षकांची महती विशद केली. यानंतर कु. चैत्राली घुले हिने मोजक्या शब्दात गुरु विषयी आपले मत मांडले. याच बरोबर इ.१० वीच्या विद्यार्थिनी कु. सिद्धी निकम व आदिती कोंडा यांनी आपले मत मांडले. समारोप करताना संस्थेच्या संस्थापिका संज्योत वैद्य या अतिशय भाऊक झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)