“स्टुडंट ऑफ द इयर 2’वरच्या टीकेला टायगर श्रॉफचे उत्तर

“स्टुडंट ऑफ द इयर 2’मध्ये टायगर श्रॉफच्या बरोबर अनन्या पांडे आणि तारा सुतारिया आहेत. या सिनेमावर सध्या एक टीका व्हायला लागली आहे. हा सिनेमा वास्तवापासून खूप दूर आहे आणि अतिशय काल्पनिक, फॅन्टॅसीने भरलेला असल्याची टीका होते आहे. त्यावर टायगरबरोबर अनन्या आणि तारानेही उत्तर दिले आहे. “या सिनेमातले “द जवानी’ हे गाणे बघताना प्रेक्षकांनी त्यातली जादू एन्जॉय करावी.’ असे अनन्याने म्हटले आहे.

या गाण्यात मुलांनी घातलेले युनिफॉर्म कधीच बघितले गेलेले नव्हते, अशी टीका झाली होती. पण ही टीका ऐकून आपल्याला गंमतच वाटली, असेही अनन्या म्हणाली. हे विद्यार्थी नेहमी बॉडी शेमिंग करत असतात, असेही म्हटले गेले पण हे विद्यार्थी शाळेतले “रोल मॉडेल’नाहीत, असेही अनन्या म्हणाली. हा सिनेमा टिपिकल शालेय जीवनावरचा साचेबद्ध सिनेमा नाही, असे टायगर म्हणाला.

या सिनेमात नव्या स्वरुपात सादर झालेल्या आरडी बर्मन यांच्या”ये जवानी है दीवानी’ या गाण्याच्यावेळी तारा आणि अनन्याला टायगरबरोबर जुळवून घ्यायला खूप कष्ट पडले होते. त्यामुळे कोरिओग्राफी खूप अवजड झाल्यासारखी वाटते. टायगरला आतापर्यंत ऍक्‍शन रोलमध्ये बघितले गेले असल्यामुळे डान्स करायला त्याला थोडे अवघडले गेल्याचेही त्याने मान्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.