स्टान्झा लिव्हिंगकडून भांडवल उभारणी 

नवी दिल्ली: विद्यार्थी को-लिव्हिंग कंपनी स्टान्झा लिव्हिंगने 73 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनीने 13 कोटी रुपये उभे केले होते. त्यात आता या निधीची भर पडली आहे. यातून कंपनी तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि कार्यात्मक जाळे मजबूत करण्यावर भर देणार आहे. स्टान्झा लिव्हिंगचे व्यवस्थापकीय संचालक अनिंद्य दत्ता म्हणाले, भारतातील विद्यार्थी वास्तव्य क्षेत्रात वाढीसाठी वाव आहे पण तरीही हे क्षेत्र अत्यंत असंघटित राहिले आहे. या क्षेत्राचा कायापालट करण्याचा निश्‍चय आम्ही केला आहे.
मोठमोठे जागतिक कंपन्यांचे समूह स्टान्झा लिव्हिंगमध्ये गुंतवणूक करत असून, आमच्या व्यावसायिक प्रारूपाबद्दल गुंतवणूकदारांना असलेल्या विश्‍वासावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असे स्टान्झा लिव्हिंगचे सह-संस्थापक संदीप दालमिया म्हणाले. विद्यार्थ्यांचे निवास या क्षेत्राने पाश्‍चिमात्य देशात स्वत:ला मालमत्ता वर्ग म्हणून प्रस्थापित केले आहे आणि स्टान्झा आपले प्रमाणबद्ध व्यावसायिक प्रारूप आणि भक्कम अर्थशास्त्र यांच्या जोरावर असाच मालमत्ता वर्ग भारतात निर्माण करेल, असा विश्‍वास आम्हाला वाटतो, असे त्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)