स्कूटर विक्रीत होंडा आघाडीवर

नवी दिल्ली: देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीमध्ये पुन्हा होंडा ऍक्‍टिवाने मजल मारली. जुलै महिन्यात ऍक्‍टिवाच्या 2,86,380 युनिट्‌सची विक्री झाली. सलग दोन वर्षांमध्ये विक्रीच्या बाबतीत होंडा ऍक्‍टिवा पहिल्या क्रमांकावर होती. मात्र दुचाकींच्या विक्रीमध्ये 15 महिन्यांनंतर घसरण झाल्याने मे 2018 मध्ये ऍक्‍टिवा दुसऱ्या स्थानी पोहोचली होती. जुलै 2017 मध्ये दहाव्या स्थानी असणारी रॉयल एनफिल्टची क्‍लासिक 350 या यादीतून बाहेर पडली. मात्र कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये वर्षाच्या आधारे 7 टक्‍क्‍यांनी वाढ होत 69,063 युनिट्‌स गेल्या महिन्यात विकले.

हीरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर विक्रीच्या बाबतीत गेल्या महिन्यात दुसऱ्या स्थानी होती. जुलैमध्ये स्प्लेंडरच्या 2,60,865 युनिट्‌सची विक्री करण्यात आली. या दुचाकीच्या विक्रीमध्ये वर्षाच्या आधारे 17.24 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली.
हीरो मोटोकॉर्पची एचएफ डिलक्‍स ही तिसऱ्या, तर याच कंपनीची पॅशन चौथ्या स्थानी आहे. सीबी शाईनच्या विक्रीमध्ये घसरण झाल्याने ती पाचव्या स्थानी आली, तर सहाव्या स्थानी बजाज सीटी पोहोचली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातव्या आणि आठव्या स्थानी हीरो मोटोकॉर्पची ग्लॅमर आणि टीव्हीएस मोटारची एक्‍सएल सुपर ही मोपेड आहे. नवव्या स्थानी टीव्हीएस ज्युपिटर, तर दहाव्या स्थानी बजाज पल्सर आहे. गेल्या महिन्यात पल्सरच्या 56,953 युनिट्‌सची विक्री झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)