स्काऊट गाईड पथकाच्या माध्यमातून जनजागृती

पिरंगुट-घोटावडे (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात स्काऊट गाईड पथकाने समुदाय विकास प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवले.
या पथकाने परिसरातील गावातील स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत या पथकाने वृक्षारोपण तसेच पाणीबचत, सामाजिक आरोग्य तसेच अन्य विषयांवर विधायक उपक्रम राबविले. गावातून रॅली काढून विविध सामाजिक, पाणी बचत, पर्यावरण आदी विषयावर जागृती निर्माण करण्यासाठी फेरी काढली. पथनाट्याद्वारे सर्वधर्म समभाव, लेक वाचवा, पर्यावरण तसेच अन्य विषयांवरील विधायक संदेश दिला. खरी कमाई या उपक्रमांतर्गत आनंद मेळाव्यामध्ये विविध लोकोपयोगी वस्तूंचे तसेच राखींचे व खाऊंच्या पदार्थांचे स्टॉल या पथकाने लावले होते. त्यामुळे परिसरात स्काऊट गाईड पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, सरपंच अभिजीत वायकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे यांनी सहकार्य केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. इचके यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड कॅप्टन मालन ववले यांनी हा उपक्रम यशस्वी राबविला. नुकताच या पथकातील सहभागी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश गोडांबे, सयाजी भेगडे, माजी सरपंच आनंद घोगरे, साहेबराव भेगडे, शेळके रमेश, संतोष गोडांबे आदी उपस्थित होते. गाईड पथकाचे कॅप्टन मालन ववले व सुनील सातव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)