सोशल मीडियावर ‘या’ जबरा फॅनचे फोटो व्हायरल

अंकारा (तुर्की): क्रीडाप्रेमी एखादा सामना पाहण्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही. फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी एका बहाद्दराने चक्क क्रेन भाड्याने घेतली आणि त्यावर चढून ती मॅच पाहिली. तुर्की कप फुटबॉल स्पर्धेदरम्यान हे मजेशीर चित्र पाहायला मिळालं.

एक चाहता डेनिझ्लिस्पॉर फुटबॉल क्लबचा खूप मोठा फॅन आहे. मात्र त्याच्यावर मैदानात येण्यास वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहू न शकणं हे त्याच्यासाठी आभाळ कोसळण्यासारखं होते. त्यामुळे त्याने शक्कल लढवून, थेट क्रेन भाड्याने घेऊन ती स्टेडियम बाहेर लावली. क्रेनवर चढून हा बहाद्दर मोठ्या ऐटित फुटबॉलचा सामना पाहू लागला.

बरं क्रेनवर चढून केवळ मॅच पाहणेच नाही तर हा बहाद्दर आपल्या क्लबला प्रोत्साहन देण्यासाठी झेंडाही घेऊन गेला होता. क्रेनवर उभे राहून, झेंडा फडकवत, तो आपल्या टीमला प्रोत्साहन देत होता. महत्त्वाचे म्हणजे तो प्रोत्साहन देत असलेला संघ 5-0 अशा मोठ्या फरकाने जिंकला. सध्या सोशल मीडियावर या जबरा फॅनचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र या फॅनला मैदानात येण्यास बंदी का घालण्यात आली होती, हे मात्र गुलदस्त्यात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)