सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी करू नका

नवी दिल्ली – सोशल मीडियाचा वापर करताना लोक अनेकदा मर्यादा विसरून जातात. तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून या माध्यमाचा वापर वाईट गोष्टी पसरवण्यासाठी करणार नाही, असा संकल्प करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. चांगल्या आणि सकारात्मक बातम्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करण्यास सांगितले आहे. वाराणसीमध्ये विविध विभागांच्या कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून ते संवाद साधत होते.

ही कोणा एका राजकीय पक्षाची गोष्ट नसून सव्वाशे कोटी लोकांचा विषय आहे, असे सांगून ते म्हणाले, की स्वच्छता अभियानाचा संबंध मानसिक स्वच्छतेशीसुद्धा आहे. वादविवाद, मतभेद, झगडे हे गल्लोगल्ली होतच असतात. पूर्वी ते न पसरता तिथल्या तिथे मिटले जात असत. आज दोन शेजाऱ्यांमधील भांडण सोशल मीडियावर अपलोड केले जाते आणि राष्ट्रीय बातमी बनते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशात सकारात्मक विचारांचे वातावरण निर्माण केले पाहिजे, असे आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सांगत असत. नकारात्मक बातम्यांमुळे नैराश्‍य पसरते. बदलत्या राष्ट्राचे चित्र लोकांसमोर आणण्यासाठी छोटे छोटे व्हिडियो तयार करून ते अपलोड केले पाहिजेत. असे सांगून मोदी पुढे म्हणाले, की आज प्रत्येक गावात वीज पोहचली आहे. राष्ट्र सर्वात जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अभिमानाने सांगाव्या अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)