सोलापूर सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचा दणका

  • जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त

अकलूज – जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी ओरबडून खाल्लेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक मंडळ रिझर्व बॅंकेच्या शिफारसीनंतर महाराष्ट्र शासनाने बरखास्त केलं आहे. त्यामुळे भल्याभल्यांची झोप उडाली आहे. जिल्हा बॅंकेत सध्या राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांची सत्ता होती. ती संतुष्टात आणण्यासाठी सहकार खात्याच्या कलम 110-अ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज सकाळी 11 वाजता बॅंकेमध्ये येऊन पदभार स्वीकारला.
मागील काही बर्षांपूर्वी बॅंकेच्या तत्कालीन चेअरमन सहसंचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले, त्यामुळे नाबार्डने यापूर्वीच बॅंकेला कारभार सुधारून 650 कोटी थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले होते; परंतू थकबाकी “जैसे थे’ राहिली. मोठमोठ्या नेते मंडळीच्या कारखाना आणि संस्थांकडे सुमारे 650 कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे बॅंकेचा एनपीए वाढला. त्याचा अहवालही यापूर्वी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या ताळेबंदात सुमारे 342 कोटींची एनपीएची तरतूद करण्यात आली आहे.
बॅंकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बॅंकेचे कर्जवाटप ठप्प झाली आहे. बॅंकेची एनपीए वाढ आणि थकबाकी वसुली नाही आणि तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप यांसह अन्य कारणांमुळे कलम 110 अंतर्गत बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बॅंकेच्या प्रशासक पदाचा भार शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शासनाने संचालक मंडळ बारखास्त केल्याने आता थकबाकीदारावंर गुन्हे दाखल होणार असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)