सोलापुरात एअर बस आणि ड्राय पोर्ट साकारणार – गडकरी

महापालिकेला डीपीआर पाठविण्याची नितीन गडकरींची सूचना

सोलापूर – मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महास्वामींना संसदेत पाठवा. मी तुम्हाला वाचन देतो अवघ्या तीन महिन्यात सोलापूरला हवेत चालणारी डबल डेक्कन बस चालू करतो. तास डीपीआर तत्काळ महापालिकेने ठराव करून पाठवा, अशा सूचना देतानाच सोलापूरला ड्राय पोर्ट करण्याचे अभिवाचन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत दिले.

सोलापुरात ब्रॉडगेज मेट्रो
नागपुरात ब्रॉडगेज मेट्रोचा कारखाना तयार होणार आहे. चार डब्यांची एसी छोट्या गाड्या आहेत. 40 किलोमीटर प्रति तास क्षमता असलेल्या या गाड्या आहेत. सोलापुरातून जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करून तासातासाला पाच ब्रॉडगेज मेट्रो धावतील. सोलापूरपासून पुण्यापर्यंत व पुण्यापासून मुंबईपर्यंत . आपण फोकनाड नेता नाही. दिलेले आश्वासन आणि घोषणा पूर्ण होतात. आपण खोटे आश्वासन देत नाही. त्यामुळे सोलापूरकरांचा मेट्रोतील गारेगार प्रवास नक्की असल्याचे गडकरी म्हणाले.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील दुष्काळी भागातील प्रश्न निकाली काढणार आहोत. सोलापूरचा टॉवेल एकवेळ जगप्रसिद्ध होता. आज स्थिती वाईट आहे. सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोलापुरात उद्योगधंदे आले पाहिजेत. रोजगार निर्माण झाला पाहिजे. येणाऱ्या काळात सोलापूरमधून एक्‍स्पोर्ट झाले पाहिजे. एक्‍स्पोर्ट होण्यासाठी लॉजिस्टिक कोस्ट मोठी अडचण आहे. सध्या देशात लॉजिस्टिक कोस्ट 18 टक्के आहे. परदेशात 48 टक्के आहे. 80 टक्के माल हा पाण्यातून वाहून नेला जातो. तर आपल्याकडे त्याची रस्त्यावरून वाहतूक होते. रोडवरून जाण्यासाठी 10 रुपये खर्च होतात. रेल्वेने जाण्यासाठी 6 रुपये खर्च येत असेल तर पाण्यातून जाण्यासाठी 1 रुपया खर्च येतो. आणि म्हणून येणाऱ्या काळात सोलापुरात जालना, सिंधी, वर्धाच्या धर्तीवर सोलापूरचे एक्‍स्पोर्ट स्वस्त होण्यासाठी व उद्योग वाढीसाठी ड्राय पोर्ट करण्याला प्राधान्य देऊ. हे झाल्यास रोजगाराची निर्मिती होईल असेही ते म्हणाले.

देशात आपण हवेत चालणाऱ्या डबल डेक्कर बसेस आणल्या आहेत. औरंगाबाद शहराने डीपीआर तयार करण्याची ऑर्डर दिला आहे. वॅपकॉस व ऑस्ट्रेलियन कंपनी गॉसल वेअर हे 28 टेक्‍नॉलॉजीचे जॉईंटव्हेंचर आहे. विनानिविदा डीपीआर तयार करून पाठवा. आपण सोलापुरात हवेत चालणारी एअर कंडिशनर हवेत चालणारी बस आणून द्यायला तयार आहे. 260 आसनक्षमता असलेली बस असून तशी 120 किलोमीटर या बसचा वेग आहे. मनपाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांसमोर सादरीकर करा व निर्णय घ्या, यासाठी मनपाला एकरूपयासुद्धा खर्च करावा लागणार असेही गडकरी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.