सोरतापवाडी शाळेत अखेर एक शिक्षक रूजू

लवकरच दोन शिक्षक येणार : प्रभातचा प्रभाव

सोरतापवाडी-सोरतापवाडी (खोरावडे वस्ती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दीड महिन्यांपासून पहिली ते चौथीसाठी फक्‍त एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे. प्रभातमधील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) रोजी शाळेत आणखी एक शिक्षक रूजू झाले आहेत. दरम्यान, अजून दोन शिक्षक रूजू होणार असल्याची माहिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी रामदास वारघडे यांनी दिली.

दरम्यान, दि. 15 ऑगस्टपूर्वी शाळेत शिक्षक नेमला नाही तर दि. 16 रोजी ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा भाजप सोशल मीडिया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्‍य चौधरी यांनी दिला होता. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले.

येथील शाळेत पटसंख्या 80 च्या आसपास आहे. 3 शिक्षकांची गरज असताना जिल्हा परिषदेच्या वतीने एकच शिक्षक कामावर हजर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक नाही म्हणून शाळेच्या दुरवस्थेपासून आधीच बदनाम असलेल्या शाळेत आता विद्यार्थी असताना शिक्षकच नसल्याचे विदारक चित्र आहे. ही सधन हवेली तालुक्‍यातील शिक्षणाबाबत शोकांतिका निर्माण झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×