सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात गुरुवारी (दि. 4) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी पावसास सुरुवात झाली. साधारण सात वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. तब्बल नऊ महिन्यानंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे परिसरातील नागरिक सुखावला. जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पाऊसानंतर गुरुवारी (दि. 4) सायंकाळच्या सुमारास चांगला पाऊस झाला असून, थोडी गारपीटही झालीण. सोमेश्वर नगर परिसरातील वाणेवाडी, मुरूम, वाघाळवाडी, करंजे, सोमेश्वर मंदिर, मुर्टी, चौधरवाडी, वाकी, सोरटे वाडी, होळ,येथील शेतकरी पाऊस नसल्याने चिंताग्रस्त झालेला आहे. हा मान्सूनचा पाऊस नाही, तरी झालेल्या पावसाने सोमेश्वरनगर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवसापासूनच वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. या वादळी पावसाने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता.
वादळी वाऱ्यामुळे परिसरातील घरांवरील काही पत्रे उडाले असून, काही भागात विद्युत प्रवाह देखील बंद करण्यात आला होता.अवकाळी पावसाने परिसरातील शेतीच्या कामांसाठी मदतच होणार आहे. याबरोबरच गुरांसाठी लागणार चारा उगवण्यासाठी झलेल्या पावसाची मदत होईल, अशी अपेक्षा परिसरातून शेतकरी व्यक्त करत आहे. मात्र, या पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले, सोमेश्वरनगर परिसरतील रस्त्यालगत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले होते.