सोमालियातील हॉटेलवर इस्लामिक दहशतवाद्यांचा हल्ला

26 जण ठार किमान 50 जखमी

मोगॅडिशु – दक्षिण सोमालियातील एका स्थानिक प्रसिद्ध हॉटेलावर अल शाबाद नावाच्या एका इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला. त्यात किमान 26 जण ठार झाले तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बंदुका आणि बॉंम्बचा वापर करून त्यांनी हा हल्ला केला. हल्लेखोर नेमके किती होते या विषयीही विविध दावे केले जात आहेत. काही जणांच्या मते हा हल्ला चार जणांनी केला. त्यांनी आत घुसून अदांधुंद गोळीबार केला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॉंबफेकही केली. हा प्रकार किसमायो गावातील मेदिना हॉटेलात घडला.

हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली गाडी या हॉटेलवर नेऊन धडकवली त्यात हॉटेलच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे असे पोलिसांनी सांगितले. स्फोटाची तीव्रत मोठी होती. अल शाबाद हा दहशतवाद्यांचा गट अलकायदाशी संबंधीत आहे. हा गट गेली सुमारे दहा वर्ष सरकारच्या विरोधात लढत आहे. सोमालियातील सरकार त्यांना उलथवून टाकायचे आहे.

हा गट इस्लामिक कायद्यानुसार देशात सरकार स्थापन करण्याच्या हेतूने लढत असून त्यांच्या गटांत किमान पाच ते नऊ हजार दहशतवादी आहेत असे सांगण्यात येते. काही काळ या गटाने दक्षिण आणि मध्य सोमालियावर नियंत्रणही मिळवले होते. सन 2011 मध्ये या गटाने आपली अलकायदाशी बांधिलकी असल्याचे जाहींर केले होते. या हल्ल्यात दोन पत्रकारही ठार झाल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.