सोमवारी स्वाभिमानीचा हल्लाबोल मोर्चा

एकरकमी एफआरपी घेण्याचा निर्धार

सातारा – सोमवार 28 जानेवारी रोजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वा. पुणे येथील अलका
टॉकिज चौकातून साखरसंकुल कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सातारा पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा मोर्चा सरकारला हदरवणारा असेल.यामध्ये एकतर एकरकमी एफआरपी घेऊ नाहीतर या सरकारचे काळेबेरे करून येऊ अशा प्रकारच्या निर्धाराने आम्ही पुण्यामध्ये जाणार आहोत असे त्यांनी सांगितले. त्या दिवशी काय होईल हे सांगता येणार नाही. सरकारने जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर पाचवड फाटा येथे 2013 रोजी जसे झालं, तशा पध्दतीचा उद्रेक सबंध महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही हे राज्यसरकारने ध्यानात घ्यावे असा इशारा देखील त्यांनी दिला. कारखानदारावर कारवाई करण्यासाठी ज्यांना आम्ही नेमले ते सहकारमंत्री सुभाष देशमुख हेच यांच्या टोळीत सहभागी झाले. त्यांच्यावरच 77 कोटींची थकबाकी आहे.

या सहकार मंत्र्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय कारवाई केली. तिजोरीच्या चाव्या नक्की कोठे गेल्या याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. उस तुटल्यापासून 14 दिवसांच्या आत कारखान्यानी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. जर ती एफआरपीची रक्कम दिली नाही. तर त्या कारखान्यांवर कारवाई करणे व 15 टक्के व्याजाने पैसे वसुल करून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरणे बंधनकारक आहे मात्र असे झाल्याचे दिसत नाही.

राज्यात 73 कारखान्यानी जवळपास साडेपाच हजार कोटीची एफआरपीची रक्कम थकवली आहे. सरकार बघ्याची भुमिका घेत असून कारखानदार आणि सरकार मिळून संगनमताने शेतकऱ्याला लुटत आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळेच खा. राजु शेट्टींच्या नेतृत्वाखाली करो या मरोच्या निर्धाराने दुष्काळी भागातील शेतकरी तसेच उस उत्पादक बांधवांनो मोठया संख्येने पुणे येथील मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)