सोमवारी कामगार युनियनची मार्केट यार्ड बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा निर्णय

पुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार युनियनच्या वतीने येत्या सोमवारी (दि.30 जुलै) बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे यांनी दिली. दरम्यान मालवाहतुकदारांचा देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा असल्याचेही कामगार युनियनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कामगार युनियनची गुरूवारी बैठक झाली. या बैठकीस अध्यक्ष चव्हाण, सचिव नांगरे, खजिनदार विलास थोपटे, कार्याध्यक्ष सुर्यकांत चिंचवले, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, किसन काळे, भाऊ अवसरे, दत्तात्रय गजघाटे, विशाल केकाणे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, सचिव राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, महात्मा फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हारपुडे, अनिल गुळवे, टेंम्पो पंचायतचे गणेश जाधव, सुरेश ठक्कर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोमवारी एक दिवसीय बंद पुकारण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सचिव नागरे यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)